शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे वाह! लग्नाच्या तीन मिनिटांनंतरच कपलने घेतला घटस्फोट, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:19 IST

सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या घटस्फोटाचं कारणही तसंच अजब आहे.

लग्नाच्या आणि घटस्फोटाच्या अनेक अजब अजब घटना नेहमीच समोर येत असतात. काही घटना इतक्या धक्कादायक असतात की, त्यांवर सहज विश्वासही बसत नाही. घटस्फोटाच्या अनेक अजब कारणांच्या घटनाही लोकांचं लक्ष वेधून घेत असतात. अशाच एका घटनेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका कपलने लग्नाच्या तीन मिनिटांनंतर घटस्फोट घेतला. लग्न झाल्यावर लगेच 3 मिनिटांनंतर घटस्फोट घेतल्याची घटना तुम्ही याआधी कधी ऐकली नसेल. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या घटस्फोटाचं कारणही तसंच अजब आहे.

तीन मिनिटांचं लग्न

इंडिपेंडेंटच्या एका रिपोर्टनुसार, कुवेतमध्ये लग्न समारंभातून बाहेर पडताच नवरदेवाने नवरीचा अपमान केला, जो नवरीला अजिबात सहन झाला नाही. ज्यामुळे त्यांच्या तिथेच वाद झाला. वाद इतका वाढला की, दोघांनी घटस्फोट घेतला. हे लग्न कुवेतमधील सगळ्यात कमी वेळ चाललेलं लग्न म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल बातम्यांनुसार कपलने लग्न झाल्याच्या तीन मिनिटांनंतर लगेच घटस्फोट घेतला.

काय होतं कारण?

मेट्रोच्या एका रिपोर्टनुसार, जेव्हा कपल रितीरिवाज पार पडल्यावर कोर्ट हाऊसमधून बाहेर आलं तेव्हा नवरीचा पाय अचानक घसरला. ज्यामुळे नवरी खाली पडली. नवरी पडताच नवरदेवाने तिला मूर्ख म्हटलं. नवरदेवाच्या या बोलण्याचा नवरीला चांगलाच राग आला आणि यानंतर दोघांमध्ये वाट पेटला. अशात नवरी लगेच कोर्ट हाऊसमध्ये परत गेली आणि तिने न्यायाधीशांना लग्न रद्द करण्यासाठी सांगितलं. नवरीचं बोलणं ऐकून आधी न्यायाधीश हैराण झाले, पण नंतर काही मिनिटात सहमतीने दोघांचं लग्न रद्द करण्यात आलं.

दरम्यान,  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका यूजरने लिहिलं की, "मी एका लग्नात गेलो होतो, जिथे नवरदेवाने आपल्या मनोगतात नवरीची खिल्ली उडवली होती. त्या नवरीने सुद्धा हेच असंच करायला पाहिजे होतं". 

घटस्फोटाची ही काही अशी पहिलीच घटना नाही. ब्रिटनमध्ये 2004 मध्ये एक कपलने लग्नाच्या 90 मिनिटांनंतर घटस्फोट घेतला होता. याचं कारण हे होतं की, महिलेला पतीचं त्याच्या मैत्रिणींसोबत जास्त क्लोज वागणं आवडलं नव्हतं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocialसामाजिक