शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

अजब-गजब प्रकार! २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून वाहू लागली धारा, तपासणीला लोक आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:35 IST

Neem Tree Liquid Flowing: गेल्या २० दिवसांपासून झाडातून ही धारा अखंड सुरूच आहे

Neem Tree Liquid Flowing: हरयाणातील जिंद येथे खरकभूरा नावाचे एक गाव आहे. तेथे जरा हटके प्रकार घडला आहे. अचानक २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून एक पांढऱ्या द्रव पदार्थाची धारा बाहेर येऊ लागला, जो अगदी दुधासारखा दिसत होता. याची बातमी लोकांना मिळताच ते भांडी घेऊन तिथे पोहोचले आणि तो द्रव पदार्थ घरी घेऊन जाऊ लागल्याची घटना घडली. काही लोकांनी याला चमत्कार मानले आणि कडुलिंबाच्या झाडाची पूजा करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच आरोग्य विभागाला याची माहिती मिळाली. आरोग्य विभागाचे पथक तात्काळ गावात पोहोचले आणि त्यांनी द्रवाचा नमुना घेतला. तसेच लोकांना चुकूनही हे द्रव सेवन करू नका असे आवाहन केले. गेली २० दिवस ही धारा अखंड सुरुच आहे.

गावकऱ्यांचे  म्हणणे काय?

गावकरी म्हणतात की झाडातून बाहेर पडणारा द्रव नारळाच्या पाण्यासारखा आहे तर काहींच्या मते तो पदार्थ दूधासारखा आहे. बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या द्रवाचा वापर करू नका, असे आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे. तरीही काही लोक हे द्रव बाटल्यांमध्ये भरून घरी घेऊन जात आहेत.

तपासणीला कोण आले?

मंगळवारी आरोग्य, वन, पंचायत आणि सार्वजनिक आरोग्य विभागांचे पथक कडुलिंबाच्या झाडातून बाहेर पडणाऱ्या द्रवाची तपासणी करण्यासाठी पोहोचले. उचाना येथील आरोग्य विभागाच्या पथकातील एमपीएचडब्ल्यू विक्रम श्योकंद म्हणाले की, ही एक रासायनिक प्रक्रिया असू शकते. कडुलिंबाच्या झाडातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात कोणताही चमत्कार नाही. गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये.

काय आहे हा पदार्थ?

वन विभागाने सांगितले की, हा झाडांमध्ये बुरशीजन्य संसर्गासारखा आजार आहे. कोणत्याही तपासणीशिवाय या पाण्याचा वापर करणे प्राणघातक ठरू शकतो. सरपंच प्रतिनिधी संजीव आणि कानुंगो रामबिलास यांनी लोकांना हे सविस्तरपणे समजावून सांगितले. वनाधिकाऱ्यांनी सांगितले की, झाडाचा पडदा फुटल्यामुळे हे घडू शकते. ज्यामुळे झाड पाणी शोषू शकत नाही आणि ते हे पाणी बाहेर फेकून देते.

टॅग्स :HaryanaहरयाणाSocial Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकJara hatkeजरा हटके