शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तिसरं महायुद्ध अन् ७० वर्षांतील सगळ्यात मोठी घटना; फ्रेंच भविष्यवेत्त्याचं २०२० साठीचं भयंकर भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:12 IST

नास्त्रेदमस काही वर्षांपूर्वी मोदी युगाची भविष्यवाणी केली होती. डायनाचा मृत्यू, अ‍ॅडॉल्फ हिटलरचा उदय, अणुबॉम्ब, द्वितीय महायुद्ध आणि ९/११ बाबतची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

फ्रान्सचे दिवंगत भविष्यवेत्ता द नास्त्रेदमस यांनी येणाऱ्या अनेक वर्षांसाठी फार पूर्वीच काही भविष्यवाणी केल्या आहेत. जगभरातील अनेक लोक त्यांच्या या भविष्यवाणींवर विश्वास ठेवतात आणि त्यांची नेहमीच चर्चा होत असते. कारण असं मानलं जातं की, त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. आता नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. या २०२० वर्षासाठी त्यांनी काय भविष्यवाणी करून ठेवली ते जाणून घेऊया....

नास्त्रेदमस यांनी २०२० साठी ज्या भविष्यवाणी केल्या आहेत, त्यात मानवतेसाठी चांगली बाब नाही. काही दुसऱ्या भविष्यवेत्त्यांनीही २०२० मध्ये विनाशाचे संकेत दिले आहेत. नास्त्रेदमस यांनी केलेल्या भविष्यवाणीत २०२० मध्ये जग नष्ट होण्याचे संकेत दडले आहेत. चला जाणून घेऊ काय म्हणाले होते ते....

नव्या युगाची सुरूवात

(Image Credit : brameshtechanalysis.com)

नास्त्रेदेमस यांच्यानुसार, २०२० मध्ये एका नव्या युगाची सुरूवात होईल. त्यांनी अंदाज लावलाय की, २०२० मध्ये अनेक देश एकमेकांमध्ये भिडतील. तसेच २०२० मध्ये आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक संकटही येईल. आकडेवारीनुसार, भारतासह जगभराची अर्थव्यवस्था फारशी चांगली नाही. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धाची सुरूवात झाली आहे. भारताच्या आर्थिक विकासात घट झाली आहे. मात्र, भविष्यवाणीत असंही सांगण्यात आलं आहे की, २०२० पर्यंत लोक आधीपेक्षा अधिक जागरूक होतील आणि लोकांमध्ये एक नविन प्रकारचा आध्यात्मिक झुकावही बघायला मिळेल.

तिसरं महायुद्ध

(Image Credit : ationalinterest.org)

नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीनुसार, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता सिद्ध होऊ शकते. २०२० मध्ये अमेरिका आशियात सर्वात मोठा सैन्य अभ्यास सुरू करेल. लोक नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीकडे याला जोडून बघत आहेत. त्यांनी २०२० हे फार हिंसक वर्ष असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यानुसार, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिनीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्नही होऊ शकतो. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही नुकसान होऊ शकतं.

राणीचा मृत्यू

भविष्यवाणीनुसार, २०२० मध्ये ग्रेट ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू ही गेल्या ७० वर्षातील येथील सर्वात विनाशकारी घटनांपैकी एक असेल. भविष्यवाणीत असंही सांगण्यात आलं आहे की, महाराणीच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स ग्रेट ब्रिटनची गादी सांभाळतील आणि लवकरत स्कॉटलॅंड व वेल्सचा दौरा करतील.

जलवायु परिवर्तन

(Image Credit : hindikiduniya.com)

नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीनुसार, यावर्षी जलवायु परिवर्तन संपूर्ण जगाला प्रभावित करेल आणि प्रदूषणाविरोधात युद्ध पातळीवर मोहिम सुरू करतील. काही देशांमध्ये भयंकर वादळ आणि भूकंप येतील तर काही ठिकाणी पूर आणि दहशतवादाने नुकसान होईल.

धार्मिक अतिवाद

(Image Credit : apologeet.nl)

तसेच मध्यपूर्व देशांमध्ये आणि जगातल्या काही भागांमध्ये धार्मिक अतिवाद वाढेल ज्याने शांतता भंग होईल आणि गृहयुद्ध सुरू होतील. अनेक लोकांना आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये शरण घ्यावी लागेल. 

नास्त्रेदमस यांच्या खऱ्या ठरलेल्या भविष्यवाणी

नास्त्रेदमस काही वर्षांपूर्वी मोदी युगाची भविष्यवाणी केली होती. डायनाचा मृत्यू, अ‍ॅडॉल्फ हिटलरचा उदय, अणुबॉम्ब, द्वितीय महायुद्ध आणि ९/११ बाबतची भविष्यवाणी खरी ठरली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पबाबतची त्यांची सांकेतिक भविष्यवाणीही खरी ठरल्याचे बोलले जाते. 

काही अभ्यासकांनुसार, नास्त्रेदमस यांनी त्यांच्या निधनाबाबतची केलेली भविष्यवाणीही खरी ठरली होती. त्यांनी स्वत:बाबत भविष्यवाणी केली होती की, ते बेंच आणि बेडजवळ मृत आढळतील. त्यांनी त्यांच्या निधनाच्या एक रात्री आधीच सांगितलं होतं की, ते पुढची रात्र जिवंत राहणार नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बेडरूममध्ये टेबलवर मृत आढळले होते. 

टॅग्स :New Yearनववर्षFranceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स