शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात होणार युद्ध! अमेरिकेची संस्था NASA देणार काँटे की ‘टक्कर’; काय आहे मिशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 05:54 IST

नासाचे अवकाशयान डिमोरफॉस या लघुग्रहावर आदळवले जाणार आहे.

अंतराळात रोज अनेक उलथापालथी घडत असतात. त्या आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. याला कारण पृथ्वीभोवतीचे वातावरण. कधीकधी या वातावरणाचा भेद करून एखादी उल्का पृथ्वीवर आदळते. त्यामुळे एखाद्या भागात हाहा:कार उडतो. पृथ्वीला असलेला हा धोका टाळला जावा आणि पृथ्वीचे संरक्षण व्हावे यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा एक प्रयोग करणार आहे. काय आहे हा प्रयोग, जाणून घेऊ या.

काय आहे मिशन?नासाने डबल ॲस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट अर्थात ‘मिशन डार्ट’ ही मोहीम आखली आहे. या अंतर्गत एक अवकाशयान तयार केले जात असून ते अंतराळात उल्केवर आदळवले जाईल. २३ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील व्हँडेनबर्ग येथून हे अवकाशयान झेपावेल. अवकाशात स्थिरावल्यानंतर पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अवकाशयानाची टक्कर घडवून आणली जाणार आहे.

मिशन डार्टचे लक्ष्य?

  • नासाचे अवकाशयान डिमोरफॉस या लघुग्रहावर आदळवले जाणार आहे.
  • दोन दशकांपूर्वी दिदीमॉस आणि डिमोरफॉस हे दोन पृथ्वीनजीक असलेले लघुग्रह आढळून आले.
  • पृथ्वीच्या नजीक असलेल्या या दोन लघुग्रहांपैकी डिमोरफॉसला अवकाशयान टक्कर देणार आहे.
  • पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिदीमॉस आणि डिमोरफॉस हे पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. म्हणजेच पृथ्वीपासून त्यांचे अंतर ११ दशलक्ष किमी असेल.
  • हे अंतर लक्षात घेऊनच सप्टेंबर, २०२२चा मुहूर्त ठरविण्यात आला आहे.
  • नासाचे अवकाशयान डिमोरफॉसवर आदळवून त्याची दिशा बदलवली जाणार आहे.
  • अनेकदा पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या उल्का पृथ्वीवर आदळण्याचा धोका असतो. धोकादायक उल्का ओळखून त्या पृथ्वीच्या वातावरणाबाहेरच नष्ट करता याव्यात, हा उद्देश या मिशनमागे आहे.
टॅग्स :NASAनासा