नागालँडचे गरिफेमा पहिले तंबाखूमुक्त गाव

By Admin | Updated: June 2, 2014 12:41 IST2014-06-02T06:11:27+5:302014-06-02T12:41:56+5:30

नागालँडमधील गरिफेमा गाव देशातील पहिले ‘तंबाखूमुक्त गाव’ठरले आहे़ गरिफेमा ग्रामपंचायत, व्हिलेज व्हिजन सेल आणि गावातील विद्यार्थी परिषदेच्या प्रयत्नांतून गावाने ही नवी ओळख

Nagaland's Gariphama is the first tobacco-free village | नागालँडचे गरिफेमा पहिले तंबाखूमुक्त गाव

नागालँडचे गरिफेमा पहिले तंबाखूमुक्त गाव

कोहिमा: नागालँडमधील गरिफेमा गाव देशातील पहिले ‘तंबाखूमुक्त गाव’ठरले आहे़ गरिफेमा ग्रामपंचायत, व्हिलेज व्हिजन सेल आणि गावातील विद्यार्थी परिषदेच्या प्रयत्नांतून गावाने ही नवी ओळख निर्माण करून संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे़ काल शनिवारी प्रधान सचिव आऱ बेनचिलो थोंग यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात ‘जागतिक तंबाखूविरोधी दिनी’ गरिफेमा तंबाखूमुक्त झाल्याचे जाहीर केले़ तंबाखू वा मद्यपान करून गावातील शांती भंग करणार्‍याला एक हजार रुपये तसेच सार्वजनिक ठिकाणी बिडी, पान, सुपारी, दारू व्यसन करणार्‍यास ५०० रुपये दंड ठोठावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Nagaland's Gariphama is the first tobacco-free village