शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

३२०० वर्ष जुन्या रहस्यमय ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 1:03 PM

जेव्हाही प्राचीन इजिप्तचा विषय निघतो, तेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जसे की, ममी, मकरबरा आणि पिरॅमिड.

(Image Credit : www.historytoday.com)

जेव्हाही प्राचीन इजिप्तचा विषय निघतो, तेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जसे की, ममी, मकरबरा आणि पिरॅमिड. इथे उत्खननात नेहमीच प्राचीन ममी मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राचीन रहस्यमय ममीचे काही किस्से सांगणार आहोत. या ममीबाबत म्हटलं जातं की, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या ममीला स्पर्श केला, त्यांचा मृत्यू झाला.

(Image Credit : evelyn-herbert.blogspot.com)

ही ममी इजिप्तचा सर्वात कमी वयाचा राजा तूतेनखामूनची आहे. ही ममी साधारण ३२०० वर्षांपासून जमिनीत दफन होती. तब्बल ९७ वर्षांआधी म्हणजे १९२२ मध्ये शोधली गेली होती आणि ब्रिटीश पुरातत्ववेत्ते हॉवर्ड कॉर्टरने या रहस्यमय ममीचा शोध लावला होता.

(Image Credit : evelyn-herbert.blogspot.com)

असे म्हणतात की, तूतेनखामूनच्या कबरेखाली मोठा खजिना गाडला होता. जेव्हा ही कबर शोधली गेली तेव्हा त्या कबरेखाली पायऱ्या आढळल्या. ज्या एका खोलीकडे जात होत्या. ही खोली सोन्या-चांदीने भरलेली होती.

(Image Credit : evelyn-herbert.blogspot.com)

सोबतच तूतेनखामूनच्या कबरेच्या दरवाज्यावर इजिप्तच्या प्राचीन भाषेत एक सूचना लिहिली होती. त्या लिहिले होते की, जे कुणी राजा तूतेनखामूनची शांतता भंग करेल, त्याचा मृत्यू होईल.

(Image Credit : evelyn-herbert.blogspot.com)

या सूचनेकडे संशोधकांनी दुर्लक्ष केलं आणि नंतर एक एक करून हॉवर्ड कॉर्टरच्या टीममधील सदस्यांचा रहस्यमय मृत्यू होत गेला. या सर्वच लोकांनी मिळून कबरेतून तूतेनखामूनची ममी हटवून खजिना काढला होता. 

(Image Credit : evelyn-herbert.blogspot.com)

मृत्यूच्या घटना इथेच थांबल्या नाही तर हॉवर्ड कॉर्टरने ज्या व्यक्तीला तूतेनखामूनची कबर आणि खजिना शोधण्याची जबाबदारी दिली होती, त्या व्यक्तीचाही काही महिन्यांनी रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. ही व्यक्ती होती लॉर्ड जॉर्ज कारनारवन. यांनीच कबरेतील ममीला हात लावला होता.

(Image Credit : evelyn-herbert.blogspot.com)

असे म्हटले जाते की, तूतेनखामूनची ही रहस्यमय ममी ज्यांनी ज्यांनी पाहिली, ते एकतर वेडे झाले नाही तर त्यांचा मृत्यू झाला. इजिप्तचे राजकुमार अली कामिलसोबतही असंच काहीसं झालं होतं. राजकुमार आणि त्याची पत्नी दोघेही ही ममी बघण्यासाठी गेले होते. मात्र घरी परतताना राजकुमाराच्या पत्नीने अचानक त्याची हत्या केली. या घटनेनंतर या ममीला अशुभ मानलं जाऊ लागलं.

(Image Credit : Egyptian Ministry Of Antiquities)

दरम्यान, हॉवर्ड कॉर्टरच्या मागणीनंतर सरकारने या ममीला त्याच ठिकाणी दफन केलं. पण पुन्हा काही वर्षांनी लॉर्ड जॉर्ज कारनारवनची मुलगी लेडी एवलिनच्या आदेशानुसार, पुन्हा ममी कबरेतून बाहेर काढण्यात आली आणि ही ममी लंडनला आणली गेली. इथे ही ममी एका म्युझिअममध्ये ठेवण्यात आली. असे म्हणतात की, लेडी एलविन या ममीने इतकी प्रभावित झाली होती की, रोज म्युझिअमला जाऊन ममी बघत होती. एके दिवशी जेव्हा ममी बघण्यासाठी ती आली तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती मरण पावली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhistoryइतिहास