रहस्यमय खड्डा जो खेचून घेतो वरून उडणारं हेलिकॉप्टर, कधी काढले जात होते इथून हिरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:37 AM2024-03-14T10:37:21+5:302024-03-14T11:03:21+5:30

Interesting Facts : ही खाण 1722 फूट खोल आणि 3900 फूट रूंद आहे. तसेच ही खाण म्हणजे जगातला दुसरा सर्वात मोठा मानवनिर्मित खड्डाही आहे.

Mysterious black hole mine that sucks in helicopters and flying objects | रहस्यमय खड्डा जो खेचून घेतो वरून उडणारं हेलिकॉप्टर, कधी काढले जात होते इथून हिरे!

रहस्यमय खड्डा जो खेचून घेतो वरून उडणारं हेलिकॉप्टर, कधी काढले जात होते इथून हिरे!

Interesting Facts : रशियाच्या पूर्व सायबेरियामध्ये एक असं ठिकाण आहे जे अनेक वर्षांपासून लोकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. या जागेबाबत लोकांमध्ये फार उत्सुकता आहे. याचं कारणही तसंच आहे. हे ठिकाण म्हणजे एक हिऱ्याची खाण आहे. पण काही साधीसुधी हिऱ्याची खाण नाही. 'मिरनी माईन' असं या खाणीचं नाव असून ही जगातली सर्वात मोठी हिऱ्यांची खाण होती. या खाणीतून मोठ्या प्रमाणात हिरे काढले जात होते. ही खाण 1722 फूट खोल आणि 3900 फूट रूंद आहे. तसेच ही खाण म्हणजे जगातला दुसरा सर्वात मोठा मानवनिर्मित खड्डाही आहे.

एका रिपोर्टनुसार, 13 जून 1955 मध्ये सोव्हिएत भूवैज्ञानिकांच्या एका टीमने या खाणीचा शोध लावला होता. ही खाण शोधणाऱ्या टीममध्ये यूरी खबरदानी, एकातेरिना एलाबीना आणि व्हिक्टर एवदीनको यांचा समावेश होता. तसेच ही खाण शोधल्यामुळे यूवी खबरदानी यांना 1957 मध्ये लेनिन पुरस्कारही देण्यात आला होता.

या खाणीच्या विकासाचं काम 1957 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. इथे वर्षातले जास्तीत जास्त महिने वातावरण खराब असतं. हिवाळ्यात तर तापमान इतकं खाली येतं की, गाड्यांमधील इंधन गोठतं आणि टायर फुटतात.

असं म्हटलं जातं की, ही खाण खोदण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जेट इंजिन आणि डायनामाइट्सचा वापर केला होता. रात्रीच्या वेळी ही खाण झाकली जाते, जेणेकरून मशीन्स खराब होऊ नये.

या खाणीचा शोध लागल्यानंतर रशिया हिऱ्यांचं उत्पादन करणारा जगातला तिसरा सर्वात मोठा देश झाला होता. पहिल्या 10 वर्षात 1 कोटी कॅरेटचे डायमंड इथून दरवर्षी काढण्यात आले. ज्यात काही तर 342.57 कॅरेटचे लेमन यलो डायमंड होते.

साधारण 20 वर्षाआधी बंद झालेल्या या खाणीवरून जर एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर उडालं तर हा खड्डा त्याना आपल्याकडे खेचून घेतो. त्यामुळे यावर विमान आणि हेलिकॉप्टर उडवण्यास बंदी आहे. खालून येणाऱ्या हवेच्या दबावामुळे क्रॅश झाले आहेत.

Web Title: Mysterious black hole mine that sucks in helicopters and flying objects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.