युवा संशोधकाने बनविले ‘मल्टी व्हेईकल चार्जर’

By Admin | Updated: September 22, 2014 02:04 IST2014-09-22T02:04:58+5:302014-09-22T02:04:58+5:30

‘गरज ही शोधाची जननी आहे....’ या उक्तीप्रमाणे गरजेतूनच एका रिक्षाचालकाच्या मुलाने मोटारसायकलसह सर्व वाहनांमध्ये मोबाइल चार्ज होऊ शकेल, असे ‘मल्टी व्हेईकल चार्जर

'Multi Vehicle Charger' made by Youth Researcher | युवा संशोधकाने बनविले ‘मल्टी व्हेईकल चार्जर’

युवा संशोधकाने बनविले ‘मल्टी व्हेईकल चार्जर’

रमाकांत पाटील, नंदुरबार
‘गरज ही शोधाची जननी आहे....’ या उक्तीप्रमाणे गरजेतूनच एका रिक्षाचालकाच्या मुलाने मोटारसायकलसह सर्व वाहनांमध्ये मोबाइल चार्ज होऊ शकेल, असे ‘मल्टी व्हेईकल चार्जर’ बनविले आहे. या चार्जरवर मोटारसायकल, रिक्षापासून तर अवजड वाहनांमध्येही मोबाइल चार्ज होऊ शकतो.
नंदुरबारमध्ये विज्ञान शाखेच्या पदवीचे शिक्षण घेणारा राज संतोष सोनवणे याने संशोधन वृत्तीतून हे नवीन मोबाइल चार्जर बनविले आहे. प्राथमिक शिक्षणापासूनच संशोधनाची आवड असलेल्या राजने अनेक नवनवीन वस्तू तयार केल्या आहेत.
माझे वडील रिक्षा चालवतात. एक दिवस रिक्षात फिरत असताना मोबाइलची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली. नेमक्या त्याचवेळी एक महत्त्वाचा फोन करावा लागणार होता. पण बॅटरी डिस्चार्ज झाल्याने मोबाइल असूनही मी तो फोन करू शकलो नाही. त्यातून महत्त्वाचा संदेश मी पोहोचवू न शकल्याची खंत होती. त्यातूनच रिक्षातही मोबाइल चार्ज का करता येऊ शकत नाही, असा प्रश्न पडला आणि त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यातून हे नवे मोबाइल चार्जर तयार झाले. त्यासाठी एक महिनाभर विचार केला. वेगवेगळ्या अंगांनी त्याचा अभ्यास केला आणि हे चार्जर तयार झाले. या चार्जरसाठी बॅटरीचे सर्किट, टीव्हीसी सर्किट आणि कन्व्हर्टर यांचा वापर केल्याचे राजने सांगितले.

Web Title: 'Multi Vehicle Charger' made by Youth Researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.