शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

कावळ्यांना घ्यायचाय बदला; 'तो' घराबाहेर पडताच करतात आक्रमण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:12 IST

मध्य प्रदेशातील ही घटना असून इथे गेल्या तीन वर्षांपासून एक व्यक्ती कावळ्यांमुळे हैराण झाली आहे.

(Image Credit : standard.co.uk)

नागीण समोर नागाला मारलं तर नागीण नंतर बदला घेते असं अनेकदा आपण गंमत म्हणून ऐकलं असेलच. पण कधी कावळेही बदला घेतात असं ऐकलंय का? नाही ना? मात्र, अशी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ही घटना असून इथे गेल्या तीन वर्षांपासून एक व्यक्ती कावळ्यांमुळे हैराण झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार. शिव असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती शिवपुरी जिल्ह्यातील सुमेला या गावात राहते. शिव जेव्हाही घराबाहेर पडतो तेव्हा त्याची नजर नेहमी आकाशाकडे लागलेली असते. त्याच्या मनात सतत भीती असते. कारण घरातून निघाल्यावर काही दूर गेल्यावर शिव याच्यावर कावळे तुटून पडतात. त्याच्यावर चोचेने आणि पंजांनी वार करू लागतात.  कधी कधी तर हे कावळे गॅंग करून त्याच्यावर हल्ला करतात. तर कधी एकच कावळा त्याच्या मागे लागतो.

शिव याच्यासोबत असं रोज होतं. तो कितीही वेळा घराबाहेर पडला तरी हे घडतं. इतकंच काय तर आता गावासाठी हा मनोरंजनाचा विषय झाला आहे. कारण कावळे सतत त्याच्या घराच्या आजूबाजूला त्याची घराबाहेर येण्याची वाट बघत बसलेले असतात.

शिवसोबत तीन वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. एका लोखंडाच्या जाळीत कावळ्याचं पिलू फसलेलं होतं. ते काढण्याचा प्रयत्न शिवने केला होता. यावर शिव सांगतो की, 'त्या कावळ्याच्या पिलाने माझ्या हाताज जीव सोडला होता. मी जर कावळ्यांना समजावू शकलो असतो तर त्यांना सांगितलं असतं की, मी त्याची केवळ मदत करत होतो. पण त्यांना वाटतं की, मीच त्याला मारलं'.

आता शिव जेव्हाही घराबाहेर पडतो तेव्हा कावळे त्याच्या डोक्यावर फिरतात आणि त्याला घाबरवतात. शिवच्या शरीरावर कावळ्यांनी केलेल्या हल्ल्याच्या अनेक खुणाही आहेत. शिव या गोष्टीने हैराण आहे की, कावळे सुद्धा वैर ठेवू शकतात आणि मनुष्यांचा चेहरा लक्षात ठेवू शकतात.

आता खरंच असं होतं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या अभ्यासकांचंही असं मत आहे की, कावळ्यांची स्मरणशक्ती फार चांगली असते. आणि ज्या लोकांनी त्यांना त्रास दिलेला असतो त्याचा चेहरा ते लक्षात ठेवतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेश