परदेशातून आलेल्या महिलेने तिसऱ्या पतीपासून लपवलं दुसऱ्या लग्नाचं सत्य, कोर्टात पोहोचलं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 04:19 PM2021-10-11T16:19:42+5:302021-10-11T16:21:29+5:30

पती विरोधात अत्याचाराची केस दाखल करणाऱ्या पत्नीबाबत पतीला समजलं की, त्याच्यासोबत लग्न करण्याआधीही त्याच्या पत्नी लग्न केलं होतं.

MP : Bhopal woman hide the truth of second marriage from third husband | परदेशातून आलेल्या महिलेने तिसऱ्या पतीपासून लपवलं दुसऱ्या लग्नाचं सत्य, कोर्टात पोहोचलं प्रकरण

परदेशातून आलेल्या महिलेने तिसऱ्या पतीपासून लपवलं दुसऱ्या लग्नाचं सत्य, कोर्टात पोहोचलं प्रकरण

Next

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळच्या कुटुंब न्यायालयात एक अनोखं प्रकरण आलं आहे. इथे एका महिलेने आपल्या पतीविरोधात हुंड्यासाठी त्रास दिल्याची केस दाखल केली होती. पण अशातच पतीला पत्नीने केला मोठा कारनामा समजला. ज्यामुळे आता उलट पत्नीच अडकलीये. 

पती विरोधात अत्याचाराची केस दाखल करणाऱ्या पत्नीबाबत पतीला समजलं की, त्याच्यासोबत लग्न करण्याआधीही त्याच्या पत्नी लग्न केलं होतं. आता पत्नीविरोधातील आवश्यक पुरावे त्याने कोर्टात सादर केले. त्यामुळे तो नाही तर त्याची पत्नीच कायदेशीर कचाट्यात अडकली.

झालं असं की, परदेशातून आलेल्या एका महिलेने कोर्टात आपल्या पती आणि त्याच्या परिवाराविरोधात हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली होतील. यावर पतीने कोर्टात सांगितलं की, त्याला हेच सांगण्यात आलं होतं की, महिलेचं दुसरं लग्न होतं. मात्र, त्याला समजलं की, पत्नीने तिसरं लग्न करण्याआधी दुसरं लग्न केल्याचं लपवलं होतं. 

पतीने बाकायदा पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचे पुरावे जमा केले आणि कोर्टासमोर सादर केले. यानंतर कोर्टाने प्रकरणाची पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. पतीनुसार पत्नीने हे सांगितलं नव्हतं की, तिच्या पहिल्या लग्नानंतर दुसरं लग्नही केलं होतं आणि तिने तिसरं लग्न केलं.  पुरावे पाहिल्यानंतर कोर्टाने हुंड्यासंबंधी केसमध्ये पतीला जामीन दिला आहे. पण त्याला देश सोडण्यावर सध्या बंदी घातली आहे.
 

Web Title: MP : Bhopal woman hide the truth of second marriage from third husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.