शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

चोरी झाली दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली, किंमत ऐकुन व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 12:16 PM

डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमधून दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला गेली आहे.

कोपनहेगन- डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमधून दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला गेली आहे. कोट्यवधी किंमतीची हिरे, सोने-चांदींनी ही बाटली मढवली गेली होती. कोपनहेगनमधील बारमध्ये ही  बाटली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पण, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ही बाटली चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. वोडक्याच्या बाटलीची किंमत १.१ मिलियन युरो म्हणजे जवळपास साडेआठ कोटी रुपये इतकी आहे.

ही बाटली तयार करण्यासाठी तीन किलो सोनं आणि तीन किलो चांदीचा वापर करण्यात आला होता. ‘माँट कार्लो कार रॅली’साठी तयार करण्यात आलेला चामड्याच्या बॅच या बाटलीच्या मध्यभागी होता. अत्यंत वैशिष्ट्पूर्ण पद्धतीनं ही बाटली घडवली होती, त्यामुळे ही सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरली. विशेष म्हणजे या बाटलीच्या कॅपमध्ये हिरे मढवले होते. 1912 च्या खास चामड्याचा बॅच या बाटलीला लावण्यात आला होता. जगभरात गाजलेल्या ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ या टीव्ही सिरिजमध्येही ही बाटली दाखवण्यात आली होती. कोपनहेगनमधील ‘कॅफे 33’ या बारमध्ये ही बाटली गेल्या काही महिन्यांपासून ठेवण्यात आली होती. रशियातील महागड्या आणि अलिशान कार आणि वोडका तयार करणाऱ्या ‘डार्ट्झ फॅक्टरी’तून बाटली आणली होती.

रात्री बार बंद झाल्यानंतर चोर बारमध्ये शिरला आणि त्यानी ही बाटली चोरली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सध्या पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.रात्री बार बंद असताना चोर बारमध्ये शिरला. भिंत तोडून चोर आत शिरला असावा, असा अंदाज बारचे मालक इंगबर्ग यांनी व्यक्त केला आहे. चोरीच्या घटनेचं मला फार दुःख झालं आहे. वोडक्याची बाटली इतर मद्याच्या बाटल्यांपेक्षा सरस होती. माझ्याकडे एकुण 1200 मद्याच्या बाटल्या आहेत पण चोरीला गेलेली बाटली सगळ्यात खास होती, असंही ते म्हणाले.