शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

या आईसक्रिमची किंमतच पाहुन तुम्हाला भरेल हुडहुडी, खायचं राहेल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 12:18 IST

दुबई हे पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन आहे. येथे जगातील महागड्या वस्तू पाहायला मिळतात. अशाच एक दुबईची माहगडी खासियत सध्या प्रचंड चर्चेत आहे ती एका ट्रॅव्हलर सेलिब्रिटीच्या पोस्टमुळे....

दुबई हे पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन आहे. येथे जगातील महागड्या वस्तू पाहायला मिळतात. अशाच एक दुबईची माहगडी खासियत सध्या प्रचंड चर्चेत आहे ती एका ट्रॅव्हलर सेलिब्रिटीच्या पोस्टमुळे. अभिनेत्री आणि ट्रॅव्हल व्लॉगर शेनाझ ट्रेझरीवाला (Shenaz Treasurywala) हिने अलीकडेच दुबईतल्या महागड्या आईसक्रीमची चव चाखतानाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसिद्ध केला आहे. हे आईसक्रिम जगातलं सर्वात महागड आईसक्रिम आहे. या आईस्क्रिमची किंमत तब्बल 840 डॉलर्स म्हणजे सुमारे 60 हजार रुपये एवढी आहे.

एवढी किंमत ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्की असं आलं असेल, की 'एवढं काय सोनं लागून गेलंय का त्या आईसक्रीमला?' या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. या आईसक्रीममध्ये खरंच 23 कॅरेट सोनंही (edible Gold) असतं. अर्थातच खाण्यायोग्य प्रकारचं सोनं त्यात वापरलेलं असतं. हे महागडं आईसक्रीम ताज्या व्हॅनिला बीन्सपासून तयार केलेलं असतं. त्यात एम्ब्रोसियल इराणी केशर, इटालियन ब्लॅक ट्रफल्सही असतात. दुबईतल्या जुमैरा रोडवरच्या एका कॅफेत हे आईसक्रीम मिळतं. या सगळ्यावर कडी म्हणजे हे आईसक्रीम Versace या इटालियन लक्झरी फॅशन कंपनीच्या अत्यंत महागड्या बाउलमध्ये सर्व्ह केलं जातं. या सगळ्यामुळे या आईसक्रीमची किंमत एवढी महागडी आहे. ब्लॅक डायमंड नावाने हे आईसक्रीम ओळखलं जातं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके