शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'हे' आहे जगातील सगळ्यात महाग सोन्याचं नाणं, ज्याच्याकडे असेल तो होईल कोट्याधीश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:06 IST

Most Costly Coin : सोशल मीडियावर या नाण्याबाबत सांगण्यात आलं आहे. हे नाणं ज्या कुणाकडे असेल ती व्यक्ती कोट्याधीश बनेल. चला जाणून घेऊ असं काय आहे या नाण्यात.

Most Costly Coin : तुम्ही अनेक अशा घटनांबाबत ऐकलं किंवा वाचलं असेल की, एखादी व्यक्ती त्याच्याकडील एखादी जुनी दुर्मीळ नोट किंवा नाणं विकून ती श्रीमंत झाली. असे बरेच लोक असतात ज्यांच्या हाती फार जुन्या दुर्मीळ गोष्टी लागतात. त्यांचा लिलाव करून कोट्याधीश बनतात. अशात सध्या एक असंच नाणं चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या नाण्याबाबत सांगण्यात आलं आहे. हे नाणं ज्या कुणाकडे असेल ती व्यक्ती कोट्याधीश बनेल. चला जाणून घेऊ असं काय आहे या नाण्यात.

डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील या नाण्याचं नाव गोल्ड डबल ईगल असं आहे. ही नाणी १९३३ मध्ये बनवण्यात आली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर @CoinCollectingWizard नावाच्या एका यूजरनं याबाबत माहिती दिली. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, हे नाणं इतकं दुर्मीळ आणि किंमती का? तर ग्रेट डिप्रेशन दरम्यान अशी ४,४५,५०० नाणी बनवण्यात आली होती. जी अमेरिकेने अधिकृत चलनात वापरली नव्हती.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांनी त्यावेळी सोन्याच्या नाण्यांच्या निर्मितीवर बंदी घातली होती. त्यांनी नागरिकांनाही सल्ला दिला होता की, जर त्यांच्याकडे ही नाणी असतील तर ती परत करावी. त्यावेळी ६ लाख नाणी गोळा करण्यात आली होती. पण एका कर्मचाऱ्याच्या चलाखीमुळे अशी १० नाणी परत जमा करण्यात आली नव्हती. हे नाणं त्यापैकीच एक आहे आणि याच कारणानं फार दुर्मीळ आहे.

१६१ कोटी रूपयांचं नाणं

हे नाणी कुणालाही १०० कोटींपेक्षा जास्त रूपये मिळवून देऊ शकतं. असं मानलं जातं की, जी नाणी शिल्लक आहेत, ती कुणा ना कुणाकडे लपून ठेवून असतील. सीएनएनच्या एका २०२१ च्या रिपोर्टनुसार, एक डबल ईगल गोल्ड कॉईन त्याचवर्षी न्यूयॉर्कमध्ये १६१ कोटी रूपयांना विकण्यात आलं होतं. हे नाणं मुळात २० डॉलरचं होतं. १९४४ मध्ये सीक्रेट सर्व्हिसकडून घोषित करण्यात आलं होतं की, जर कुणाकडे हे नाणं असेल तर ते नाणं चोरी केलेलं ग्राह्य धरून कारवाई केली जाईल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल