महिना 7 लाख कमावतो हा रेडा, आली 9 कोटींची ऑफर

By Admin | Updated: February 23, 2017 11:55 IST2017-02-23T11:19:53+5:302017-02-23T11:55:49+5:30

हरियाणाच्या कुरूक्षेत्र येथील रहिवासी करमवीर सिंग यांचा हा रेडा महिन्याला तब्बल 7 लाख रूपये कमावतो. युवराज असं या रेड्याचं नाव

Monthly earns 7 lakhs, this offer is 9 crores | महिना 7 लाख कमावतो हा रेडा, आली 9 कोटींची ऑफर

महिना 7 लाख कमावतो हा रेडा, आली 9 कोटींची ऑफर

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,  दि. 23 - सात लाख रूपये महिन्याला कमावणारा एका रेडा नवी दिल्लीच्या शेती विकास जत्रेमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरलाय. हरियाणाच्या कुरूक्षेत्र येथील रहिवासी करमवीर सिंग यांचा हा  रेडा महिन्याला तब्बल 7 लाख रूपये कमावतो. युवराज असं या रेड्याचं नाव आहे. 
 
या रेड्याला विकत घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या एका व्यापा-याने तब्बल 9 कोटींची ऑफर करमवीर सिंग यांना दिली होती मात्र त्यांनी याला नकार दिला.   या रेड्याला दिवसाला 20 लीटर दूध, पाच किलो बदाम आणि 12 किलो इतर सुका मेवा देण्यात येतो. या रेड्याच्या विर्याला चांगलीच मागणी आहे, त्याचं  विर्य विकून करमवीर सिंग महिन्याला 7 लाख रूपये कमावतात. 
 
आता हा युवराज 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पंडीत  दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका जत्रेत सर्वासाठी आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. 

Web Title: Monthly earns 7 lakhs, this offer is 9 crores