मुलासाठी 'त्या' माऊलीने मगरीशी दिली झुंज, मगरीच्या नाकात बोट घालून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:28 PM2020-04-21T15:28:04+5:302020-04-21T15:29:56+5:30

मगरीने या चिमुरड्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची आईने मगरीशी सामना केला आहे.

Mom saves three year old son from jaw crocodile by sticking fingers up reptiles nose in zimbabwe myb | मुलासाठी 'त्या' माऊलीने मगरीशी दिली झुंज, मगरीच्या नाकात बोट घालून वाचवला जीव

मुलासाठी 'त्या' माऊलीने मगरीशी दिली झुंज, मगरीच्या नाकात बोट घालून वाचवला जीव

Next

आई आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार असते. तुम्हाला आजपर्यंत आईने मुलांना वाचवण्याासाठी आपल्या प्राणांची बाजी लावल्याच्या अनेक घटना माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला एक अशाच घटनेबद्दल सांगणार आहोत. झिम्बाब्वेमधील एका आईने आपल्या मुलाला मगरीच्या तावडीतून वाचवलं आहे. मगरीने या चिमुरड्यावर हल्ला केल्यानंतर त्याच्या आईने मगरीशी सामना केला आहे. या महिलेने मगरीच्या नाकात बोट घालून आपल्या मुलाला वाचवलं आहे.

द मिरर ने दिलेल्या माहितीनुसार  मैरीन मुसिनीयाना आपल्या दोन मुलांसाठी मासे पकडण्यासाठी जात होती. त्याचवेळी  ही घटना घडली. मासे पकडायला जाताना ती आपल्या मुलांना नदीकाठी बसवून गेली होती. या ३० वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला तेव्हा मैरिना नदीच्या किनारी परत आली आणि मगरीच्या अंगावर तिने उडी मारली. नंतर तिने आपली बोटं मगरीच्या नाकात घातली, कारण नाक बंद झाल्यामुळे मगरीला श्वास घेता येणार नाही. मग या महिलेने दुसऱ्या हाताने आपल्या मुलाला खेचलं.( हे पण वाचा-CoronaVirus : खरं सांगताय की मस्करी? लॉकडाऊनमध्ये कुत्रे दारू पोहोवतायत घरोघरी...

आपल्या मुलाचा बचाव करत असताना या महिलेच्या तोंडाला  जखम झाली. त्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मौरिनाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की,  मी दक्षिणपूर्वेतील चिरडजी शहरात वास्तव्यास आहे. मगरीपासून बचाव करण्याची कला आपल्या घरातील मोठ्यांपासून शिकली . मगरीचे एका हाताने नाक दाबून दुसऱ्या हाताने मुलाला खेचले. अशी माहिती मौरिनाने दिली. झिम्बाब्वेमध्ये मगरीची संख्या खूप जास्त आहे. जवळपास २० फुटांपर्यंत लांबी असलेल्या सुद्धा मगरी असतात. ( हे पण वाचा-हुकूमशहा किम जोंग उनची तीन अपत्ये जगासाठी आजही रहस्य...)

Web Title: Mom saves three year old son from jaw crocodile by sticking fingers up reptiles nose in zimbabwe myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.