एका मॉडेलनं आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंग करवण्याचा निर्णय घेतला. एकाच वेळेच्या शॉपिंगमध्ये या व्यक्तीनं तब्बल ९ लाख रूपये खर्च केले. यानंतर त्यानं आपण या सर्व गोष्टींबाबत सध्या शिकत असल्याचंही त्यानं सांगितलं. ब्राझिलचा मॉडेल आर्थर ओ उर्सो पहिल्यांदा आपल्या ९ महिलांसोबत लग्न करून चर्चेत आला होता. तेव्हा त्यानं आपण फ्री लव्ह सेलिब्रेट करत असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.
नुकतीच त्याची एक पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आणि सध्या तो आपल्या ८ पत्नींसह राहत आहे. आर्थरनं ब्राझिलीयन व्हॅलेंटाईन्स डेवर पत्नीवर आपलं प्रेम व्यक्त करण्यााठी गिफ्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १२ जून रोजी ब्राझिलीयन व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो.