शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

किम कार्दिशयानसारखी दिसण्यासाठी तिने ४ कोटी खर्चून केल्या ४० सर्जरी! आता पस्तावतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 10:24 IST

एका मॉडेलने आपल्या फेव्हरेट मॉडेलसारखं दिसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कित्येक सर्जरी केल्या पण तिचा प्रयत्न चांगलाच फसला.

एखाद्याचा फॅन असणं, त्याच्यासारखे कपडे घालणे, त्याच्यासारखं चालणं-बोलणं इतपत ठिक आहे. पण काही फॅन असे असतात ज्यांना हुबेहूब त्या व्यक्तीसारखंच दिसायचं असतं, जिचे ते फॅन असतात. त्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होतात. अशाच एका मॉडेलने आपल्या फेव्हरेट मॉडेलसारखं दिसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कित्येक सर्जरी केल्या (Woman plastic surgery to look like Kim Kardashian).

ब्राझीलमधील २९ वर्षांची जेनिफर पँपलोना (Jennifer Pamplona) ब्राझीलमधील एक मॉडेल आहे. अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही स्टार किम कार्दशियानची (Kim Kardashian) ती डाय हार्ड फॅन आहे. जेनिफरला लहानपणापासूनच किम खूप आवडते. तिच्यासारखं दिसण्याची तिला इतकी हौस होती तिने फक्त आपले कपडेच नाही तर लूकही तिच्यासारखा करण्याचा निर्णय घेतला (Brazilian model looks like Kim Kardashian).

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार रुपये उधळले.  किमसारखं दिसण्यासाठी जेनिफरने 12 वर्षांत तब्बल 40 पेक्षा जास्त सर्जरी केल्या. त्यासाठी तिला 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला.  2010 साली जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा तिने पहिली सर्जरी केली. त्यानंतर तिला सर्जरी करण्याची हौस आली. तिने बट इम्लांट केलं, फॅट इन्जेक्शन घेतलं, ओठ-गाल-नाक सर्व अवयवांचा आकार बदलून घेतला. तिने इतक्या सर्जरी केल्या की ती हुबेहूब किमसारखी दिसू लागली. पण आता तिला त्याचाच त्रास होतो आहे.

लोक तिला किमसारखी दिसत असल्याचंच म्हणू लागले. इन्स्टाग्रामवर तिचे एक दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत पण ते फक्त ती किमसारखी दिसते म्हणून. जे तिला बिलकुल आवडत नव्हतं. आपण आपली ओळख गमावली असं तिला वाटू लागलं. 

आता तिला आपला जुना चेहरा पुन्हा हवा आहे. इस्तानबुलमध्ये तिने एका डॉक्टराकडून नाक, फॅट रिमुव्हल, चेहरा, गळा अशा सर्व सर्जरी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिला 95 लाख रुपये खर्च करावे लागले. आपला मूळ चेहरा परत मिळवण्यासाठी तिला इन्फेक्शनही झालं. ज्यामुळे तीन दिवस तिच्या चेहऱ्यातून रक्त वाहत होता. आता ती ठिक झाली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके