शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

या मॉडेलने अनेक कपलचं केलंय ब्रेकअप, इतर तरुणींच्या बॉयफ्रेंड्ससोबत करते 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 21:30 IST

ही तरुणी ना कुणाची गर्लफ्रेंड आहे, ना मैत्रीण ज्यामुळे कपलमध्ये दुरावा येईल. पण तरी ही तरुणी कित्येक कपलचं रिलेशनशिप तोडण्यास कारणीभूत ठरली आहे.

कपलमध्ये वाद, भांडणं झाल्यावर काही वेळा प्रकरण घटस्फोट किंवा ब्रेकअपपर्यंत पोहोचतं. पण अशा कित्येक कपलचं नातं तुटण्यासाठी कारणीभूत ठरली आहे ती एक तरुणी. ही तरुणी ना कुणाची गर्लफ्रेंड आहे, ना मैत्रीण ज्यामुळे कपलमध्ये दुरावा येईल. पण तरी ही तरुणी कित्येक कपलचं रिलेशनशिप तोडण्यास कारणीभूत ठरली आहे. यामागे आहे एक खास कारण (Woman doing men loyalty test).

ब्रिटनच्या एसेक्समध्ये राहणारी जॉर्जिया रोज. जिचं रिलेशनशिपमध्ये स्वतःचं हार्ट ब्रेक झालं होतं. त्यानंतर तिने असं काम सुरू केलं ज्यामुळे कित्येक कपलने ब्रेकअप केला आहे, कित्येक कपल्सनी आपलं नातं तोडलं आहे. तिच्या जाळ्यात येताच किती तरी कपल एकमेकांपासून वेगळी झाली आहेत. जॉर्जियाने स्वतःच याबाबत खुलासा केला आहे.

जॉर्जिया लॉयल्टी टेस्टचं काम करून तरुणींना मदत करते. म्हणजे ज्या तरुणींना आपल्या पार्टनरची लॉयल्टी टेस्ट करायची आहे, त्या जॉर्जियाला संपर्क करतात आणि तिला आपल्या पार्टनरची लॉयल्टी टेस्ट करायला सांगतात. तरुणींच्या सांगण्यावरून त्या तरुणींच्या पार्टनरशी बोलते. पार्टनरचं बोलणं, वागणं तिच्यासोबत कसं असतं ते ती त्या तरुणींना सांगते. जर संबंधित तरुणीचा पार्टनरने आपल्या रिलेशनशिपबाबत न सांगता, जॉर्जियाशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते टेस्टमध्ये फेल होतात. असे टेस्टमध्ये फेल झालेल्या कित्येक तरुणांच्या पार्टनरने त्यांच्यासोबत नातं तोडलं आहे.

जॉर्जिया सांगते, तिच्याकडे दररोज तरुणींचे किमान 200 मेसेज येतात, या तरुणींना आपल्या बॉयफ्रेंडची लॉयल्टी टेस्ट करायची असायची. इतके मेसेज पाहून तिलाही भीती वाटते. पण तिला हे काम सोडायचं नाही.

जॉर्जियाने नुकताच पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका पुरुषासोबत संवाद साधला. त्याने आपण सिंगल असल्याचं सांगितलं आणि जॉर्जियाला एका हॉटेलमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली. एका प्रेग्नंट महिलेच्या पार्टनरची लॉयल्टी टेस्ट केली तेव्हा तिला सर्वात जास्त धक्का बसला.

डेली स्टारशी बोलताना 20 वर्षांच्या जॉर्जियाने सांगितलं, माझ्याशी सुरुवातीला संपर्क करणाऱ्या तरुणींपैकी ती एक होती. ती आपल्या मुलामुळे आपल्या पार्टनरसोबत राहू लागली. या प्रकरणाबाबत मला थोडी भीती वाटत होती कारण यात त्या दोघांमध्ये एक मूल होतं. त्यामुळे जॉर्जियाने त्या तरुणीला तिला खरंच आपल्या पार्टनरची लॉयल्टी टेस्ट करायची आहे का असं विचारलं. तेव्हा त्या तरुणीने होकार दिला.

त्या तरुणीच्या पार्टनरने जॉर्जियाला सर्वात आधी सांगितलं की तो रिलेशनशिपमध्ये आहे. पण आपण एकमेकांना जाणून घेण्यास हरकत नसल्याचं तो म्हणाला. त्यानंतर त्याने जॉर्जियाचा स्नॅपचॅट मागितला तेव्हा त्याची पार्टनर असलेल्या त्या प्रेग्नंट तरुणीने त्याच्यासोबच नातं पुढे द्यायला नकार दिला. तिने त्याच्यासोबत नातं तोडलं. जॉर्जिया गेल्या दोन महिन्यांपासून लॉयल्टी टेस्ट करत आहे. त्यामुळे ती टिकटॉकवर खूप प्रसिद्ध आहे. जॉर्जिया सांगते अनेकांनी तिला ब्लॉक केलं आहे आणि तिच्याबाबत तरुणांनी आपल्या गर्लफ्रेंडलाही सांगितलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके