बेपत्ता अँजेल गोर्ट घराच्या छतावरच होता

By Admin | Updated: July 2, 2017 00:32 IST2017-07-02T00:32:23+5:302017-07-02T00:32:23+5:30

उन्हाळी शिबिरात जाणे टाळण्यासाठी ११ वर्षांचा अँजेल गोर्ट घराच्या छपरावर गेला व पोलिसांकडे मात्र तो बेपत्ता झाल्याची नोंद झाली

The missing Angel Gort was on the roof of the house | बेपत्ता अँजेल गोर्ट घराच्या छतावरच होता

बेपत्ता अँजेल गोर्ट घराच्या छतावरच होता

हिली (फ्लोरिडा) : उन्हाळी शिबिरात जाणे टाळण्यासाठी ११ वर्षांचा अँजेल गोर्ट घराच्या छपरावर गेला व पोलिसांकडे मात्र तो बेपत्ता झाल्याची नोंद झाली. त्याचा शोध पोलिसांनी कुठे कुठे घेतला याचे छायाचित्रण हेलिकॉप्टरमधून करणाऱ्या डब्ल्यूएसव्हीएन या वाहिनीच्या बातमीदाराला तो त्याच्याच (गोर्ट) घराच्या छतावर आढळला. हा मुलगा बेपत्ता झाल्याच्या बातमीसाठी राल्फ रेबर्न हा वार्ताहर हेलिकॉप्टरमधून त्याच्या घराचे छायाचित्रण करीत होता. अँजेल छतावर दिसताच राल्फने पोलिसांना कळवले व मग त्यांनी त्याला खाली घेतले. मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. पोलीस अधिकाऱ्यांचाही वेळ मला वाया घालायचा नव्हता. यात माझ्या आईला त्रास झाला, असे अँजेलने ‘डब्ल्यूएसव्हीएन’ शी बोलताना सांगितले. अँजेलला एडीएचडीचा त्रास असून त्याचे वागणेही सामान्य मुलांसारखे नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस आणि हेलिकॉप्टर आल्याचे पाहून मी बरीच काही गडबड करून ठेवल्याचे माझ्या लक्षात आले, असे अँजेल गोर्ट म्हणाला. अँजेल बेपत्ता होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही त्याने मी परत असे काही करणार नाही, असे आश्वासन दिले होते.

Web Title: The missing Angel Gort was on the roof of the house