शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

"पत्नीला फुटकी कवडीही देणार नाही..."; घटस्फोटाआधी पतीने कोट्यवधींच्या घराला लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 11:48 IST

करोडपती आणि प्रोफेशनल गोल्फर फ्रान्सिस मॅकगिरिक यांनी स्वतःच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या घराला आग लावली आहे.

पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद झाल्यानंतर नातं तुटतं. ते अनेकदा घटस्फोटाचा निर्णय घेतात. पण घटस्फोटानंतर आपल्या उत्पन्नाचा आणि संपत्तीचा भाग हा पती पत्नीला देऊ इच्छित नसतात, असं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार - अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घटस्फोटानंतर फुटकी कवडीही मिळू नये म्हणून पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 

इंग्लंडमधील सँडविचमध्ये ही घटना घडली आहे. येथे ब्रिटीश करोडपती आणि प्रोफेशनल गोल्फर फ्रान्सिस मॅकगिरिक यांनी स्वतःच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या घराला आग लावली आहे. घटस्फोटानंतर पत्नीला घर किंवा त्यातील हिस्सा मिळू नये म्हणून त्यांनी हे सर्व केलं. हे असं असूनही, फ्रान्सिस जेलमध्ये जाण्यापासून थोडक्यात वाचले आहेत.

५० वर्षीय फ्रान्सिस यांच्यावर सँडविचमधील £९००,००० ($१.४ मिलियन - ११.६८ कोटी) घराला आग लावण्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी २५ जून रोजी घरी कोणी नसताना त्याने हे केलं. यानंतर त्याने पत्नीला मेसेज केला की, तो घराला आग लावणार आहे. मात्र, त्याने घराला आग लावल्यानंतर शेजाऱ्यांनी वेळीच आपत्कालीन सेवा बोलावल्याने घराचे मोठं नुकसान होण्यापासून वाचलं.

कॅरोलिन नाइट यांनी कोर्टाला सांगितलं की, घटनेच्या वेळी त्या व्यक्तीची पत्नी सारा एका डिनर पार्टीला गेली होती. फ्रान्सिस यांनी प्रथम कुकिंग ऑईलचा वापर करून आग लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही फायदा झाला नाही तेव्हा त्यांनी लिविंग रुमधील उशांना लायटरने आग लावली. ते साराला सतत मेसेज करत होते - "मी घराला आग लावली आहे. मी पाळीव कुत्रा डॉलीला खिडकीबाहेर फेकून देणार आहे."

जेव्हा फायर फायटर्स घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर जळत होतं. त्यांनी फ्रान्सिस यांना घराबाहेर विचित्रप्रकारे वागताना पाहिलं. त्यांना किरकोळ भाजलं होतं. पण  उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला. फ्रान्सिस यांनी आपल्या पत्नीला शेजाऱ्यांसमोर शिवीगाळ केली आणि सांगितलं की तिला ही संपत्ती कधीच मिळू नये अशी माझी इच्छा आहे. 

टॅग्स :fireआगDivorceघटस्फोट