शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

चार बायका फजिती ऐका! ९१ वर्षाच्या उद्योगपतीने २६ वर्षांनी लहान चौथ्या पत्नीला दिला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 12:00 IST

रूपर्ट मरडॉक यांनी आतापर्यंत चार लग्न केली आहेत. त्यातलं शेवटचं म्हणजे चौथं लग्न त्यांनी 65 वर्षांची अभिनेत्री जेरी हॉल (Jerry Hall) हिच्याशी केलं होतं. आता मात्र त्यांचा घटस्फोट (Divorce) होतो आहे.

अमेरिकेच्या माध्यम क्षेत्रातील नामांकित (American Media Mogul) व्यक्तिमत्त्व असलेले रूपर्ट मरडॉक (Rupert Murdoch) सध्या ९१ वर्षांचे आहेत. मोठे बिझनेसमन असणारे मरडॉक अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मरडॉक स्वतःच माध्यम क्षेत्रात आहेत, त्यातही इतर अनेक गोष्टींमुळे ते चर्चेत असतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांची अनेक लग्न. आता मात्र लग्नामुळे नाही, तर घटस्फोटामुळे त्यांची चर्चा होते आहे. रूपर्ट मरडॉक यांनी आतापर्यंत चार लग्न केली आहेत. त्यातलं शेवटचं म्हणजे चौथं लग्न त्यांनी ६५ वर्षांची अभिनेत्री जेरी हॉल (Jerry Hall) हिच्याशी केलं होतं. आता मात्र त्यांचा घटस्फोट (Divorce) होतो आहे. 

मीडिया टायकून आणि अब्जावधींची (Billionaire) संपत्ती असणारे रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा घटस्फोट घेणार आहेत. अभिनेत्री जेरी हॉलशी त्यांनी लंडनमध्ये झालेल्या एका समारंभात २०१६ मध्ये लग्न केलं होतं. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मरडॉक यांनी सुपरमॉडेल हॉलपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते दोघंही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करतील. मरडॉक यांचं हे चौथं लग्न आहे. पॅट्रिशिया बुकर हिच्याशी त्यांनी पहिल्यांदा लग्न केलं होतं. १९५६ ते १९६७ अशी ११ वर्षं त्यांचं पहिलं लग्न टिकलं. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अ‍ॅना मारिया टोव हिच्याशी दुसरं लग्न केलं. १९६७ ते १९९९ पर्यंत दुसऱ्या पत्नीसोबत त्यांचा संसार सुरु होता. मात्र नंतर तिलाही घटस्फोट दिला. 1999 मध्ये वेंडी डेंग हिच्याशी त्यांनी तिसरं लग्न केलं. १४ वर्षांनी या दोघांचाही शेवटी घटस्फोट झाला. २०१४ मध्ये हा घटस्फोट झाल्यानंतर जेरी हॉल हिच्याशी २०१६ मध्ये मरडॉक यांनी लग्न केलं. आता याही लग्नाचा शेवट घटस्फोटात होतो आहे.

रिपोर्टनुसार, या घटस्फोटामुळे मरडॉक यांच्या बिझनेसवर काहीही परिणाम होणार नाही असा अंदाज आहे. मरडॉक यांचे समभाग असणारी फॉक्स कॉर्पोरेशन ही कंपनी फॉक्स न्यूज चॅनेल (Fox News Channel) आणि वॉल स्ट्रील जर्नल (Wall street Journal) या कंपन्यांची पेरेंट कंपनी आहे. मरडॉक त्यांच्या नेवाडा येथील कौटुंबिक ट्रस्टच्या माध्यमातून फॉक्स कॉर्प आणि न्यूज कॉर्प या दोन कंपन्यांची जबाबदारी सांभाळली जाते. या ट्रस्टची या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास ४० टक्के भागीदारी आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, मरडॉक यांची एकूण संपत्ती १७.७ बिलियन डॉलर इतकी आहे. त्यांनी जगभरात माध्यम कंपन्यांचं मोठं जाळं विणलं आहे.

बिझनेसच्या क्षेत्रात त्यांची चर्चा एरव्ही होतच असते; पण आता त्यांच्या चौथ्या घटस्फोटाची चर्चाही बरीच होते आहे. त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान असणाऱ्या चौथ्या पत्नीला ते आता घटस्फोट देणार आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके