शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील 'या' ठिकाणी अनेक भावांना असते एकच पत्नी, सगळे मिळून करतात सुखाने संसार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:32 IST

ही प्रथा आता कमी झाली असली तरीही कायम आहे. दोन्ही राज्यातील काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती आहेत. 

Weird Tradition : अनेकदा काही पुरूषांनी एकापेक्षा जास्त लग्न केल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. पण भारतात काही भाग असेल आहेत जिथे एक महिला एकापेक्षा जास्त पती करू शकते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागांमध्ये बहुपती प्रथा आहे. ही प्रथा आता कमी झाली असली तरीही कायम आहे. दोन्ही राज्यातील काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती आहेत. 

तुम्ही पाहिलं किंवा वाचलं असेल की, महाभारतात द्रोपदीने पाच पांडवांसोबत लग्न केले होते. आजच्या काळातही एका महिलेने पाच भावांशी लग्न केलंय. हिमाचल प्रदेशमध्ये ही प्रथा आजही पाळली जाते. इथे एक महिला परिवारातील एका पुरूषासोबत लग्न करते आणि नंतर तिचं लग्न पतीच्या सर्व भावांसोबतही होतं. हे सगळे मिळून पती-पत्नीसारखा संसार करतात. हिमाचलमध्ये बहुपती परंपरेनुसार, एकाच छताखाली राहणारे सगळे भाऊ एका तरूणीसोबत परंपरेनुसार लग्न करतात. जर महिलेच्या पतींपैकी एकाचं निधन झालं तर महिलेला दु:खं व्यक्त केलं देऊ देत नाहीत.

"फारवर्ड प्रेस" याबाबत एक मुलाखत केल होती. ज्यानुसार अशा लग्नांना कायदेशीर मान्यता नाही. पण समाजात अशी स्थिती आहे की, त्यांना मान्यता मिळते. अशा लग्नांना ञमफो पोसमा म्हटलं जातं. 

21 वर्षीय रजोने पाच भावांशी केलं लग्न

देहरादूनच्या एका गावात 21 वर्षीय रजोने पाच भावांशी लग्न केले. रजोने 2013 मध्ये या पाच भावांशी लग्न केले होते. अशाप्रकारे बहु पती प्रथा ही या भागात अनेक वर्षांपासून चालत आली आहे.

या भागात एकाच महिलेसोबत लग्न करण्याची प्रथा सुरु होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या भागात महिलांची संख्याही कमी आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात ही प्रथा आजही आहे. 

यानुसारच रजोने पाच भावांशी लग्न केलंय. रजो आता काही मुलांची आई आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या मुलांचा वास्तविक पिता कोण आहे हे कुणालाही माहीत नाही. या परिवारात यावरुन कोणते वादही होत नाही. रजो आपल्या पाचही पतींसोबत आनंदी आहे. त्यासोबतच पाचही भाऊ रजोवर खूप प्रेम करतात. रजोला ही प्रथा बालपणापासून माहीत होती. कारण तिच्या आईचेही तीन पती होते. रजो आनंदी आहे कारण तिला तीन पतींचं प्रेम मिळतं. 

कसं चालतं वैवाहिक जीवन?

लग्नानंतरचं वैवाहिक जीवन इथे एका टोपीवर निर्भर करतं. समजा लग्नानंतर कोणताही एक भाऊ पत्नीसोबत एकांतात असेल त्यावेळी खोलीबाहेर दरवाज्यावर एक टोपी ठेवतो. हे सगळे भाऊ मान मर्यादेचं इतकं भान ठेवतात की, दरवाज्यावर टोपी दिसली की जर कुणीही खोलीच्या आत जात नाहीत. 

कुटुंबप्रमुख असते महिला

येथील एक खास बाब म्हणजे इथे पुरुष नाहीतर महिला घरातील प्रमुख असतात. त्यांच्याकडे पती आणि मुलांची योग्यप्रकारे काळजी घेण्याची जबाबदारी असते. पत्नीला इथे गोयने असं म्हटलं जातं तर पतीला गोर्तेस म्हणतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न