शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हनीमुनच्याच रात्री तिला समजलं तिच्या नवऱ्याबाबतच सत्य! महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 15:49 IST

ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत तब्बल ५ वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करायचा देखील निर्णय घेतला. पण लग्न झाल्यानंतर असे काही घडले की महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली.

असं म्हणतात की काहीवेळा आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही. त्यासाठी खूप संयम बाळगावा लागतो. एका महिलेच्याबाबतीतही असेच काहीसे झाले. ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत तब्बल ५ वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करायचा देखील निर्णय घेतला. पण लग्न झाल्यानंतर असे काही घडले की महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली. हनीमुनच्या दिवशीच तिला तिच्या बॉयफ्रेंड जो आता तिचा नवरा झाला होता त्याबाबतच धक्कादायक सत्य समजलं.

महिलेने सांगितले की ५ वर्षांनंतर कुठे अखेर आम्ही विवाहाच्या बंधनात अडकत होतो. आम्हा दोघांसाठी सुद्धा हा काळ अगदी खास होता. आम्ही दोघे कधी नव्हे ते जास्त बिझी झालो. माझा बॉयफ्रेंड तर अधिक बिझी झाला कारण त्याने लग्नाच्या ४ महिने आधीच नवीन लॉ फर्म जॉईन केली. त्यामुळे हळूहळू लग्नाच्या तयारीपासून सुद्धा तो दूर होऊ लागला. त्याला खूप काम असेल म्हणून मी सुद्धा त्याला समजून घेतले. मी लग्नाआधी एक खास पार्टी आयोजित केली. ज्यात जवळचे सर्व खास लोक होते. त्या पार्टीमध्ये सुद्धा तो अगदीच शांत होता. आपलं लग्न होतंय याबाबत तो जास्त आनंदी वाटला नाही. पुढे काही दिवसांतच माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. 

थोड्याच दिवसांत आमच्या लग्नाचा दिवस आला. पण तरी त्याच्यामध्ये मला कोणताच उत्साह दिसत नव्हता. तो अगदी नाखूष वाटत होता. नक्की काय झालंय हे जाणून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण तो मला हेच समजावत राहिला की कामाच्या ताणतणावामुळे त्याचं कशातच लक्ष नाही. मी सुद्धा त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. मला वाटलं हनिमूनला गेल्यावर त्याच्यात बदल दिसेल. हनिमूनसाठी आम्ही बालीची निवड केली होती. मी त्या काळाची आतुरतेने वाट पाहू लागली. कारण आम्ही तेव्हा खऱ्या अर्थाने एकमेकांचे होणार होतो.

लग्नाचे सर्व रितीरिवाज पूर्ण केल्यानंतर अखेर तो हनिमूनचा दिवस आला, महिलेने सांगितले की ती खूप खुश होती पण त्याचा चेहरा तसाच निरुत्साही दिसत होता. मी त्याच्या आवडीचे खास कपडे परिधान केले होते. पण त्याने त्याबाबत एक चक्कार शब्द सुद्धा काढला नाही. तो जास्तच टेन्शन मध्ये वाटत होता. आम्ही हॉटेलला पोहोचलो तेव्हा त्याने बाहेर फिरायला जाण्यास नकार दिला. त्याला फक्त हॉटेलच्या रूम मध्येच राहायचे होते. जेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ आलो तेव्हा त्याने मला कीस केले पण ते कीस अगदीच मनाविरुद्ध वाटले. हा तो व्यक्ती नक्कीच नव्हता ज्याच्यावर मी गेल्या ५ वर्षांपासून प्रेम करत होते. मला आता अधिक जास्त भीती वाटू लागली होती.त

त्यावेळी तिला शंका आली अन् तो झोपलेला असताना तिने त्याचा मोबाईल चेक केला. पण त्यात असे काहीच मेसेज नव्हते. इतक्यात एक मेल आला. त्यात विचित्र काहीतरी आढळून आल्याने तिने तो उघडून पाहिला तर त्यात एका स्त्रीने रोमँटिक मेसेज पाठवला होता. तिने सर्व मेल्स चेक केले, तेव्हा मला खात्री पटली की तो तिला फसवतो आहे आणि आता त्याचे मन दुसऱ्या स्त्री मध्ये अडकले आहे. तिने सांगितले की, एका मेल मधून तिला चक्क हॉटेलचे बिल सुद्धा मिळाले ज्या हॉटेलमध्ये जाऊन दोघांनी शारीरिक संबंध देखील ठेवले होते.

तिनं त्याला झोपेतून उठवून या सगळ्याचा जाब विचारला. तेव्हा तो घाबरलेला दिसला. तिनं लगेच मुंबईसाठी फ्लाइट बुक केली आणि तेथून निघून गेली. त्यानंतर तिने त्याच्याशी सर्व नातेसंबध तोडले व कधीही माफ न करण्याची शिक्षा दिली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न