शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीने रस्त्यावर उडवले 1.6 कोटी रूपये, परिवाराचं बॅंक खातं केलं रिकामं; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 09:47 IST

ओरेगनमध्ये राहणारा 38 वर्षीय कॉलिन डेविस मॅक्‍कार्थी एक कार ड्रायव्हर आहे. त्याला दुसऱ्यांची मदत करणं खूप आवडतं. तो नेहमीच लोकांची सेवा करत होता.

लोकांची मदत करणारे दिलदार लोक जगात कमी नाहीत. असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई गरीब लोकांमध्ये वाटली. अनेक अब्जोपती लोक आपल्या कमाईतील मोठी भाग लोकांच्या सेवेसाठी खर्च करतात. यात एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे हे लोक स्वत:साठीही काहीना काही वाचवून ठेवतात. पण अमेरिकेतील एका ड्रायव्हरने आपल्या परिवाराची पूर्ण संपत्ती रस्त्यावर उडवली.

न्‍यूयॉर्क पोस्‍टच्या रिपोर्टनुसार, ओरेगनमध्ये राहणारा 38 वर्षीय कॉलिन डेविस मॅक्‍कार्थी एक कार ड्रायव्हर आहे. त्याला दुसऱ्यांची मदत करणं खूप आवडतं. तो नेहमीच लोकांची सेवा करत होता. एक दिवस त्याला वाटलं की, बॅंकेत पैसे ठेवून काय करायचं, ते लोकांच्या कामात येतील. आपण त्यांना पैसे दिले तर ते आपल्याला आशीर्वाद देतील. ज्यानंतर आपण पुन्हा मालामाल होऊ.

मॅक्‍कार्थीने आपल्या परिवाराच्या बॅंक खात्यातील 200,000 डॉलर म्हणजे साधारण 1.6 कोटी रूपये काढले आणि ओरेगन इंटरस्टेट हायवेवर जाऊन कारमधून ते बाहेर उडवले. अचानक पैशांचा पाऊस पाहून हायवेवर एकच गोंधळ झाला. हजारो लोक पैसे गोळा करू लागले. अनेक कार चालक पैसे घेऊन मालामाल झाले. हे बघून पोलीस मॅक्‍कार्थीच्या मागे लागले. त्याला पकडलं, पण काही कारवाई केली नाही.

पोलिसांना या गोष्टीची चिंता सतावत होती की, पैसे गोळा करण्याच्या नादात एखादा अपघात होऊ नये. कारण तिथे गर्दी जमा झाली होती. ज्यांना पैसे मिळाले ते मालामाल झाले, पण ज्यांना मिळाले नाही ते निराश झाले. ते म्हणाले की, मॅक्‍कार्थी चांगलं काम करत होता. त्याच्यावर काही कारवाई होऊ नये. दुसरीकडे मॅक्‍कार्थीचा परिवार कंगाल झाला. त्यांना लोकांना पैसे परत देण्याचं आवाहन केलं, पण कुणीही परत दिले नाहीत. पोलिसही परिवाराची काही मदत करू शकत नाही कारण मॅक्‍कार्थीचंही बॅंक खात्यात नाव होतं. त्याला पैसे काढण्याचा अधिकार दिला होता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य