शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'तू गोळी झाड, बघ मी हुकवणार', गांजा पिऊन मित्रानं मारली फुशारकी; जागीच गेला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:10 IST

काही सेकंदात एक मित्र खूनी बनला तर दुसऱ्याचा जीव गेला. हे सगळं गंमतीगंमतीत झालं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण घटना.

मित्रांचं आपल्या जीवनात खूप महत्वाचं स्थान असतं. त्यामुळे विचार करूनच मित्र निवडण्याचा सल्ला घरातील लोक देत असतात. मित्रांची संगत अनेकदा तुम्हाला योग्य मार्ग दाखवते, तर कधी तुमचं जीवन उद्ध्वस्तही करते. आज आम्ही तुम्हाला दोन अशा मित्रांबाबत सांगणार आहोत, ज्यांची गंमत दोघापैकी एकाच्या जीवावर बेतली. मित्रांसोबत बसून दारू पिणं ही बाब आजकाल कॉमन झाली आहे. पण नशेत केल्या गेलेल्या गोष्टी खूप महागातही पडू शकतात. अमेरिकेतील दोन मित्रांसोबत असंच काहीसं झालं. काही सेकंदात एक मित्र खूनी बनला तर दुसऱ्याचा जीव गेला. हे सगळं गंमतीगंमतीत झालं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण घटना.

‘तेरा भाई गोली से भी बच जाएगा’

अमेरिकेच्या उटाहमधील ही घटना आहे. इथे २३ वर्षीय एश्टन जोनाथन मॅन नावाच्या तरूणाला अटक करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी एश्टन आपल्या मित्रासोबत घरी बसून होता. दोघेही बसून गांजा ओढत होते आणि बंदुकीवर चर्चा करत होते. बोलत-बोलत दोघेही गॅरेजपर्यंत गेले आणि बंदूक बघताच त्याचा मित्र म्हणाला की, तो गोळी वाचवू शकतो. आधी एश्टननं त्याचं हे स्किल टेस्ट करण्यासाठी रिकामी बंदूक चालवली आणि मित्रानं वेगानं उडी घेत स्वत:ला वाचवलं. हा खेळ ६ वेळा खेळण्यात आला आणि शेवटी एश्टननं मित्रावर गोळी झाडली. मात्र, यावेळी गोळी थेट मित्राच्या छातीत लागली आणि तो तिथेच पडला.

गमतीत गमावला जीव

मित्राला गोळी लागल्याचं पाहून एश्टननं लगेच अ‍ॅम्बुलन्स बोलवली आणि त्याला फर्स्ट एड देण्याचाही प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली तेव्हा त्यांना घरात दोन हॅंडगन सापडल्या आणि काही कागद सापडले. ज्यावरून समजलं की, दोघेही गांजाचा वापर करत होते. पोलिसांनी एश्टनला अटक केली आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी