शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

श्वास घेण्यास होता त्रास, सत्य समजताच डॉक्टरही झाले हैराण; रिपोर्टमध्ये दिसला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 09:50 IST

एका व्यक्तीला खूप दिवसांपासून श्वास घेताना त्रास जाणवत होता. पण डॉक्टरकडे जाताच व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली.

आरोग्य विषयक काही समस्या या आपण हलक्यात घेतो. त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते आपल्याला चांगलंच महागात पडू शकतं. अनेकदा त्याचे अनेक गंभीर परिणाम हे भोगावे लागू शकतात. शरीरावर त्याचा वाईट परिणाम होता. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीला खूप दिवसांपासून श्वास घेताना त्रास जाणवत होता. पण डॉक्टरकडे जाताच व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. रिपोर्टमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. ज्यामुळे डॉक्टर देखील हैराण झाले. 

एका 38 वर्षीय व्यक्तीला खूप दिवसांपासून श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळे त्याने माऊंट सिनाई नावाच्या एका क्लिनिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जेथे त्याला एक असं सत्य समजलं जे समजल्यावर तो हादरलाच. नेमकी समस्या समजून घेण्यासाठी रायनोस्कोपी करण्यात आली. रायनोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये रुग्णाच्या नाकाची तपासणी करण्यासाठी नाकामध्ये एक ट्यूब टाकली जाते. त्या ट्यूबमध्ये एक छोटासा कॅमेरा देखील असतो. 

तपासणीमध्ये रुग्णाच्या नाकाच्या पाठच्या बाजुस एक दात आल्याचं पाहायला मिळालं. जो एखाद्या हाडासारखा दिसत होता. डॉक्टरांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये डिसेंबरमध्ये एक रिपोर्ट व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतीही जखम झालेली नव्हती किंवा डोकं किंवा चेहऱ्यावर काही वेगळपण पाहायला मिळालं असं म्हटलं आहे. ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. सागर खन्ना आणि डॉ. मायकल टर्नर यांनी याची नीट तपासणी केली असता त्यांना नाकामध्ये एक सफेद रंगाची कडक गोष्ट दिसली. 

14 मिलीमीटरचा दात होता. डॉक्टरांना तो बाहेर काढण्यात आता यश आलं आहे. हा हटवण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी यामध्ये सर्व गोष्टी नॉर्मल आढळून आल्या आहेत. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत नाही. अशा समस्या या जेनेटिक असून त्या याआधी देखील समोर आल्या आहेत. तर काही रुग्णांमध्ये कोणतंच याबाबत लक्षण दिसून येत नाही. स्कॅन करताना चुकीच्या ठिकाणी दात आल्याचं समोर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके