शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्कराची क्षमता वाढवणारी देशभक्त बायको हवी; बेरोजगार तरुणाची लग्नासाठी जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:21 IST

एका बेरोजगार तरुणाला देशाची फौज वाढवणारी मुलगी हवी आहे. एका तरुणाने मुलीसाठी ठेवलेल्या अटी पाहिल्यावर तुम्हीही डोक्यावर हात माराल.

नवी दिल्ली - लग्नाबद्दल प्रत्येकानेच काही स्वप्न रंगवलेली असतात. आपला जो़डीदार नेमका कसा हवा हे मनात पक्क केलेलं असतं. काही ओळखीच्या मंडळींद्वारे लग्न जुळवली जातात. तर हल्ली एखाद्या विवाह संकेतस्थळावरून देखील असंख्य लग्न जमतात. काही जण असा मुलगा हवा किंवा अशी मुलगी हवी अशी जाहिरात देखील देतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. एका बेरोजगार तरुणाला भारतीय लष्कराची क्षमता वाढवणारी देशभक्त बायको हवी आहे. एका तरुणाने मुलीसाठी ठेवलेल्या अटी पाहिल्यावर तुम्हीही डोक्यावर हात माराल. 

तरुणाने लग्नासाठी मुलगी हवी म्हणून दिलेल्या या जाहिरातीची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली असून तो फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये बिहारमध्ये एका डेंटिस्ट तरुणाने आपल्या जोडीदारासाठीच्या अटी दिल्या असून तो स्वत: मात्र बेरोजगार आहे. त्याला नोकरी करणारी आणि श्रीमंत बायको हवी आहे. त्यातही आपली होणारी बायको देशभक्त असायला हवी. भारतीय लष्कराची आणि स्पोर्ट्स क्षमता वाढवण्याची इच्छा तिच्यात असावी असंही म्हटलं आहे. 

डॉक्टर अभिनव कुमार असं ही जाहिरात देणाऱ्याचं नाव आहे. त्याने जाहिरातीच्या सुरुवातीला थोडक्यात आपली माहिती दिली आहे. आपण बिहारमध्ये राहत असून एक डेंटिस्ट आहोत आणि  सध्या आपण बेरोजगार असल्याचं त्याने या जाहिरातीत स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतर त्याने आपल्याला कशी नवरी हवी आहे, हे सांगितलं आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार, "मुलगी गोरी, सुंदर, प्रामाणिक, धाडसी आणि श्रीमंत हवी. मुलांना सांभाळण्यात ती एक्सपर्ट असावी."

"मुलगी देशभक्त असायला हवी. भारतीय लष्कराची आणि स्पोर्ट्स क्षमता वाढवण्याची इच्छा तिच्यात असावी" असं म्हटलं आहे. लग्नाची ही अजब जाहिरात पाहून लोक हैराण झाले आहेत. काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. लग्नाचे हे असा भन्नाट किस्से नेहमीच समोर येत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटके