शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

क्लबमध्ये भेटलेल्या तरूणीला घरी बोलवलं, 5 कोटी रूपयांच्या वस्तू घेऊन झाली गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 15:17 IST

महिलेने मियामीमधील एका व्यक्तीला नशेचा पदार्थ दिला, त्यानंतर त्याच्या तिजोरीमधून मौल्यवान वस्तू गायब केल्या. यात दागिने, रोख रक्कम आणि महागडी घड्याळं यांचा समावेश आहे.

Girl Stolen Money: अनेकदा जेव्हा लोक पार्टी किंवा इतर ठिकाणी जातात तेव्हा त्यांना अनोळखी व्यक्तींबाबत आकर्षण वाटतं. हे महिला आणि पुरूष दोघांमध्येही बघायला मिळतं. अशात काही लोक कशाचाही विचार न करता त्यांच्याबाबत मोठं पाउल उचलतात. पण हे घातकही ठरू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती एका नाइट क्लबमध्ये गेली आणि तिथे एका तरूणीसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला घरी बोलवलं. ती तरूणी घरी तर आली, पण त्या व्यक्तीचं इतकं नुसकान झालं की, तो आयुष्यभर विसरणार नाही.

फॉक्स न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना फ्लोरिडाच्या मियामीमधील आहे. मियामी पोलीस एका महिलेचा शोध घेत आहेत. आरोप आहे की, या महिलेने मियामीमधील एका व्यक्तीला नशेचा पदार्थ दिला, त्यानंतर त्याच्या तिजोरीमधून मौल्यवान वस्तू गायब केल्या. यात दागिने, रोख रक्कम आणि महागडी घड्याळं यांचा समावेश आहे. हे सगळं मिळून साधारण 5 कोटी रूपयांचा ती चुना लावून गेली. हे सगळं तिने त्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर केलं.

पोलीस रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ही घटना सकाळी घडली जेव्हा ती व्यक्तीच्या घरातून परत येत होती. या व्यक्तीला ही तरूणी एका नाइट क्लबमध्ये भेटली होती आणि त्याने तिला घरी बोलवलं होतं. असं सांगण्यात आलं की, ही तरूणी या व्यक्तीच्या घरी रात्री गेली होती आणि सकाळी ती जाताना दिसली. तेव्हा ती एकटीच होती. जेव्हा घरातील व्यक्ती शुद्धीवर आली तेव्हा तिजोरी रिकामी होती.

यादरम्यान महिलेने तिजोरी रिकामी केली होती. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने व्यक्ती नशेचा पदार्थ दिला आणि त्याला बेशुद्ध केलं. ती बाहेर निघण्याआधी व्यक्तीने महिलेसोबत एक ड्रिंक घेतलं होतं. सकाळी उठून पाहिलं तर तिजोरीतील वस्तू गायब होत्या. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, ही व्यक्ती महिलेसोबत येताना दिसत आहे. पण जेव्हा ती परत गेली तेव्हा ती एकटी होती. 

तिचं फुटेज बिल्डींगमधील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. फुटेजमध्ये महिला जीन्स जॅकेटसोबत पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये आणि मिनीस्कर्टमध्ये दिसत आहे. तिच्या हातात गुलाबी केस असलेला आयफोन आहे. लिफ्टमधून बाहेर येताना तिच्या हातात एक कपही दिसत आहे. पण जेव्हा ती आत गेली तेव्हा तिच्या हातात हा कप नव्हता. पोलीस तिचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी