शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गुगलवर सर्च केलं आईचं नाव, सत्य समजताच हादरला व्यक्ती, पायाखालची जमीनच सरकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:49 IST

एका व्यक्तीला इंटरनेटद्वारे त्याच्या जन्मदात्या आईबद्दल असं काही सत्य समजलं की त्याला धक्काच बसला.

प्रत्येक व्यक्ती आपल्या आई-वडिलांशी भावनिकरित्या खूप जोडली गेलेली असते. ही व्यक्ती त्यांच्यासाठी जीवही देऊ शकते, प्रत्येक सुख-दु:खात साथ देण्याचा प्रयत्न करते, पण जेव्हा आई-वडील काही संकटात सापडतात तेव्हा मुलांना अतिशय वेदना होतात. नुकतंच एका व्यक्तीला इंटरनेटद्वारे त्याच्या जन्मदात्या आईबद्दल असं काही सत्य समजलं की त्याला धक्काच बसला. सत्य जाणून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली (Man Found Shocking thing About Mother on Google).

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या लीड्समध्ये राहणारा 30 वर्षीय रीस मॅडिक आणि त्याच्या भावाला अॅलन आणि कॅरोल मॅडिक यांनी तेव्हा दत्तक घेतलं होतं जेव्हा हे दोघंही अगदी लहान होते. मात्र त्यांना त्यांची खरी आई लिंडा मॅकआरिटी हिला अधूनमधून भेटण्याची परवानगी होती.

सर्वकाही ठीक चाललं होते, पण त्यांची खरी आई लिंडाने त्यांना सलग तिसऱ्या ख्रिसमससाठी घरी बोलावलं नसल्याने त्यांची चिंता वाढली. रीकेला लिंडाबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. तो आईला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. गेल्या महिन्यात, रीके रात्री २ वाजता लिंडाचा विचार करत मोबाईल बघत होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की लिंडाला गुगलवर सर्च करावं. त्याला वाटलं की आपल्याला तिच्याबद्दल काहीतरी नवीन सापडेल, पण Google वर शोधल्यावर जे सापडलं ते खूप धक्कादायक होतं.

२०१८ मध्ये रीकेची खरी आई लिंडा मरण पावल्याचं त्याला गुगलमुळे समजलं. तिची कोणीतरी हत्या केली होती. एका लेखात लिंडाबद्दल लिहिलेल्या गोष्टी वाचून रीके थक्क झाला. त्याला समजलं की त्याची आई ड्रग्ज घेत असे (Drug Addict Mother) आणि ड्रग्जच्या भांडणात दुसऱ्या व्यक्तीने तिचा खून केला. इयान कार असं या मारेकऱ्याचं नाव असून त्याला १७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. जेव्हा रीके १६ वर्षांचा होता, तेव्हा त्याला समजलं होतं की त्याची आई ड्रग्ज घेते, म्हणून त्याने त्याच्या आईपासून दूर राहाण्यास सुरुवात केली. परंतु ती त्याच्या वाढदिवस आणि ख्रिसमसला त्याला फोन करायची.

आईच्या मृत्यूची बातमी कळताच रीकेला धक्का बसला. ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप त्याने पोलिसांवर केला. मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे, की लिंडाच्या मृत्यूची बातमी आम्ही तिच्या बहिणीला दिली, तेव्हाही तिने लिंडाला दोन मुलं असल्याचं आम्हाला सांगितलं नाही. आता रीकेला इयानला भेटून गे जाणून घ्यायचं आहे, की त्याने रीकेच्या आईला का मारलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके