शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

50 वर्षापासून गॅरेजमध्ये धूळ खात पडली होती मौल्यवान वस्तू, शटर उचलताच बदललं त्याचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:34 IST

या व्यक्तीच्या गॅरेजमध्ये 50 वर्षापासून एक रेअर विंटेज कार पडून होती. आता ही कार ज्या किंमतीत विकली जाणार त्याने त्याची गरीबी दूर होणार.

कधी कुणाचं नशीब कसं चमकेल काहीच सांगता येत नाही. अशा अनेक घटनांबाबत तुम्ही वाचलं किंवा ऐकलं असेलच. सध्या अशाच एका घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. एका व्यक्ती हे माहीतच नव्हतं की, त्याचं नशीब चमकवणारी एक वस्तू त्याच्याच गॅरेजमध्ये पडली आहे. अनेक वर्षापासून ही वस्तू गॅरेजमध्ये धूळ खात पडली होती. 

या व्यक्तीच्या गॅरेजमध्ये 50 वर्षापासून एक रेअर विंटेज कार पडून होती. आता ही कार ज्या किंमतीत विकली जाणार त्याने त्याची गरीबी दूर होणार. या लिमिटेड एडिशनच्या कारसाठी अनेक खरेदीदार बाजारात आहेत. लवकरच या कारचा लिलाव केला जाणार आहे. जी कार गॅरेजमध्ये आढळली ती आपल्या काळातील सगळ्यात वेगाने धावणारी कार होती. या कारचं नाव आहे Facel Vega HK 500. ही राइड हॅंडने चालवली जाते आणि या कारचे केवळ 96 मॉडल तयार करण्यात आले होते.

या कारचं मॉडल फार रेअर आहे. याच मॉडलच्या लेफ्ट हॅंड कारची किंमत साधारण 61 लाख रूपये सांगण्यात आली. पण ही कार राइट हॅंड असल्याने याची किंमत तर आणखी जास्त मिळू शकते. ही कारण 1964 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. या कारची बोली साधारण 3 कोटी रूपयांपर्यंत जाऊ शकते. ही गॅरेजमध्ये अनेक वर्षापासून धूळ खात पडली होती. 

इतकी वर्ष धूळ खात पडल्याने कार बाहेरून भंगार दिसत होती. पण कारचं इंटेरिअर अजूनही शानदार आहे. याच्या मोटरमध्ये Brunswick Blue चं ओरिजिनल पेंटवर्क आहे. असं सांगण्यात येत आहे की, लिलाव करण्याआधी ही कार रिपेअर केली जाईल. लिलाव करणारे स्पेशलिस्ट माइक डेविस म्हणाले की, ही कार एक रत्न आहे. इतकी वर्ष कार बंद गॅरेजमध्ये पडली होती. ती बाहेर येणं एक स्पेशल मोमेंट आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल