शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

2 मिनिटात तो प्यायला पचनाचं बॉटलभर औषध, शंभर रूपयांच्या पैजेसाठी गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 12:44 IST

South Africa : ही जीवघेणी पैजेची घटना साऊथ आफ्रिकेतील एलिमच्या माशबामधून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू पोटाचं औषध असलेली बॉटल पिण्याने झाला होता.

मित्रांमध्ये गंमत सतत सुरू असते. मित्र एकमेकांना वेगवेगळी अजब चॅलेंजेसही देत असतात. काही चॅलेंज मजेदार असतात तर काही जीवघेणे ठरतात. साऊथ आफ्रिकेतील एका व्यक्तीसोबत त्याच्या मित्रांनी एक जीवघेणी पैज लावली. या व्यक्तीला अन्न पचवणारं औषध दोन मिनिटांमध्ये प्यायचं होतं. जर तो ही पैज जिंकला असता तर त्याला 100 रूपये मिळाले असते. व्यक्तीने पैज जिंकली सुद्धा. पण पैजेचे 100 रूपये घेण्यासाठी तो जिवंत वाचला नाही.

ही जीवघेणी पैजेची घटना साऊथ आफ्रिकेतील (South Africa) एलिमच्या माशबामधून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू पोटाचं औषध असलेली बॉटल पिण्याने झाला होता. या व्यक्तीला पूर्ण बॉटल 2 मिनिटांमध्ये संपवायची होती. या व्यक्तीचं वय 25 ते 30 सांगण्यात आलं. या व्यक्तीचा मृत्यू ब्लूड कॉर्नर कार वॉश अॅन्ड लिक्वर रेस्टॉरन्टमध्ये झाला. तिथे बसूनच त्याने औषधाची बॉटल संपवली होती. ही जीवघेणी पैज त्याच्या मित्रांनीच त्याच्यासोबत लावली होती. तर पैजेचं बक्षीस 100 रूपये होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 10 जुलैची आहे. रात्री साधारण 11 वाजता व्यक्तीचा रेस्टॉरन्टमध्ये मृत्यू झाला. त्याने त्याच्या मित्रांसोबत 100 रूपयांची पैज लावली होती. या पैजेत व्यक्तीला Jägermeister नावाचं अन्न पचनाचं औषध 2 मिनिटांमध्ये प्यायचं होतं. या बॉटलमध्ये 35 टक्के अल्कोहोल असतं. व्यक्तीने दोन मिनिटात ते संपवलं. पण बॉटल संपताच त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याला चक्कर येऊ लागले होते. त्यानंतर त्याला मित्रांनी खाली बसवलं.

औषध संपल्यावर त्याची तब्येत बिघडली होती. ज्याच्यामुळे नंतर त्याचा मृत्यू झाला. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. सोबतच प्रकरणाची चौकशी सुरू केली. ही पैज गावातीलच एका रेस्टॉरन्टमध्ये लावली गेली होती. ज्यात विजेत्याला 100 रूपये मिळणार होते. पण औषध पिताच त्याचा मृत्यू झाला आणि तो पैजेचे पैसेही घेऊ शकला नाही.

 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाJara hatkeजरा हटके