१२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 07:13 PM2021-09-18T19:13:50+5:302021-09-18T19:15:37+5:30

डेली स्टारमद्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव देसुकी होरी आहे. देसुकीने सांगितलं की, आधी तोही दिवसातून साधारण ८ तास झोप घेत होता.

Man claims he has slept only thirty minutes a day for last twelve years reveals fitness secret | १२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य

१२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य

Next

असं म्हणतात की, निरोगी शरीरासाठी कमीत कमी ७ ते ८ तास झोप घेणं फार गरजेचं असतं. पण जपानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने दावा केला आहे की, तो गेल्या १२ वर्षांपासून पूर्ण दिवसभरात केवळ ३० मिनिटे झोप घेतो.

डेली स्टारमद्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव देसुकी होरी आहे. देसुकीने सांगितलं की, आधी तोही दिवसातून साधारण ८ तास झोप घेत होता. पण हळूहळू त्याने झोपण्याचा वेळ कमी करून ३० मिनिटे केला. गेल्या १२ वर्षापासून तो दिवसातून केवळ अर्धा तास झोप घेतो.

डेसुकीने सांगितलं की, तो जपान शॉर्ट स्लीपर असोसिएशनचा चेअरमन आहे. तो शेकडो लोकांना कमी झोप घेऊनही फीट राहण्याची पद्धत शिकवत आहे. त्याचा असाही दावा आहे की, याने लाइफस्टाईल प्रोडक्टिव झाली.

त्याने सांगितलं की, दिवसातले १६ तास काम करण्यासाठी त्याला कमी वाटतात. त्यांना वाटतं की, जर तुम्ही दिवसातले ८ तास झोपले तर तुम्हाला जे हवं ते मिळवू शकणार नाहीत. त्यानंतर त्यांनी झोपेचे तास कमी करणं सुरू केलं.

डेसुकी म्हणाला की काही वर्षांच्या प्रॅक्टिसनंतर त्याने आपल्या झोपेा वेळ कमी केला आणि आता तो केवळ ३० मिनिटेच झोपतो. त्याला कधीही अलार्म लावण्याची गरज पडत नाही. आपोआप त्याची झोप उघडते.
 

Web Title: Man claims he has slept only thirty minutes a day for last twelve years reveals fitness secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.