शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

बाबो! ऑनलाइन ऑर्डर केलेल्या यूज्ड फ्रीजमध्ये सापडले ९६ लाख रूपये; रातोरात बनला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 14:21 IST

एका व्यक्तीला ९६ लाख रूपये कॅश सापडले आहे तेही  एका फ्रीजमध्ये. हा फ्रीज त्याने ऑनलाइन ऑर्डर केला होता. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण....

तुम्ही रातोरात लखपती किंवा कोट्याधीश झालेल्या लोकांचे अनेक किस्से ऐकले असतील. ज्यात कुणाची लॉटरी निघाली असेल तर कुणाला पैशांनी भरलेली बॅग सापडली. पण तुम्ही कधी ऐकलं का की, एका फ्रीजने एका व्यक्तीला लखपती बनवलं असेल. अशीच एक घटना समोर आली आहे. दक्षिण कोरियात एका व्यक्तीला ९६ लाख रूपये कॅश सापडले आहे तेही  एका फ्रीजमध्ये. हा फ्रीज त्याने ऑनलाइन ऑर्डर केला होता. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण....

येथील एका व्यक्तीने एका यूज्ड फ्रीज ऑनलाइन ऑर्डर केला होता. ज्याच्या खालच्या भागात कुणीतरी टेपच्या मदतीने १.३० लाख डॉलर(९६ लाख रूपये) चिटकवले होते. ज्याबाबत त्याला काहीच अंदाज नव्हता. रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती दक्षिण कोरियातील जेजू आयलॅंड य़ेथे राहणारी आहे. तेच पोलिसांनी सांगितलं की, या व्यक्तीने ६ ऑगस्टला कॅश सापडल्याचा सूचना दिली होती. (हे पण वाचा : वाह रे वाह! प्रेमविवाहात मदत केली म्हणून दोन भावांना मोठी शिक्षा, दंडाची रक्कम वाचून चक्रावून जाल)

त्याने पोलिसांना सांगितलं की, फ्रीजची सफाई करत असताना खालच्या भागात नोटांचे बंडल चिटकवलेले दिसले होते. एमबीसी न्यूजनुसार, पैसे ट्रान्सपरंट प्लास्टिक शीट्समध्ये गुंडाळून पॅक केले होते आणि टेपच्या मदतीने फ्रीजच्या खालच्या भागात चिटकवले होते. 

महत्वाची बाब म्हणजे इतका पैसा मिळूनही या व्यक्तीने चुकीचा विचार केला नाही. त्याने सगळा पैसा पोलिसांकडे नेऊन दिला. पण अजूनही या व्यक्तीचा लखपती बनण्याचा मार्ग अजून बंद झालेला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या कायद्यानुसार, जर हे पैसे घेण्यासाठी कुणी समोर येत नसेल तर तो सर्व पैसा त्याच व्यक्तीला मिळणार. फक्त त्याला २२ टक्के टॅक्स सरकारल द्यावा लागेल. त्यासोबतच जर या पैशांवर कुणी दावा केलाच आणि म्हणाला की, हा पैसा माझा आहे तरी सुद्धा ज्याला हे पैसे सापडले त्या व्यक्तीला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळू शकते. 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके