lokmat Supervote 2024

(image credit- youtube)

उद्या महाशिवरात्र आहे.  महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त मोठ्या संख्येने उपवास करतात. महादेवाला वंदन करण्यासाठी आपल्या घराच्या आसपासच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. तर काहीजण घरीच पूजा करतात. पण जर पूजा करण्याचा योग्य विधी माहीत नसेल तर पूजा कशी करावी हा प्रश्न पडतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करायची याबद्दल सांगणार  आहोत. 

या दिवशी शंकराच्या पिंडीला अभिषेक केला जातो. जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक  या पैकी तुम्ही काहीही करु शकता. जर तुम्ही शंकराला अभिषेक करणार असाल. तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी ताम्हणात शिव पिंड घेऊन त्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करु शकता. हे करताना ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जाप करा.  

जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य असेल तर पहाटे उठून स्नान करुन पुरुष आणि महिला दोन्हीही मंदिरात जाऊ शकता. शिवाच्या पिंडीला अभिषेक करु शकता. महाशिवरात्रीचा उपावास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात.


अशी करा पुजा

सगळ्यात आधी शिवाच्या पिंडीवर दूध, मध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो.  बेल हे आत्मा शुद्धीकरण्याचे प्रतिक मानले जाते म्हणून बेलाचा अभिषेक करण्याचा उल्लेख पुराणात आहे. प्रत्येक देवाला काही खास वाहिले जाते हे आपण जाणतो. त्याच प्रमाणे शंकराला बेल वाहिली जाते हे तुम्ही ऐकले असेलच त्यानंतर मूर्तीला सिंदूर लेपन केले जाते. यामध्ये हळदी कुंकू नाही तर भस्म वापरले जाते.

महादेवाला फळांचा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हणतात की फळ ही दिर्घायू आणि संतुष्ट जीवनाचे प्रतीक आहे. त्यानंतर देवापुढे धूप लावला जातो. धूप हे भरभराटीचे प्रतीक आहे.देवापुढे दिवा लावला जातो. जो ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल आहे. पुराणानुसार देवापुढे विड्याची पाने ठेवली जातात. संसारिक सुख आणि कौटुंबिक आनंदाचे ते प्रतीक आहे. ( हे पण वाचा-Mahashivratri : उपवासाचे फायदे वाचून उपवास न करणारे ही करतील!)

महाशिवरात्रीचा शुभमुहूर्त

महाशिवरात्रीची तीथी २१ फेब्रुवारी २०२०
चतुर्थी तिथि प्रारंभ: संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांपासून 
चतुर्थी तिथि समाप्‍त :२२ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजून २ मिनिटांपर्यंत
रात्रीच्या पुजेची वेळः २१ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांपासून १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत

Web Title: Mahashivratri pooja and fasting, know about methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.