शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पुतीन यांच्या एक्स-वाइफने केलं लग्न, सगळ्यांनाच प्रश्न कुणी दाखवली इतकी हिंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 17:20 IST

सगळ्यांनाच प्रश्न पडत आहे की, ही व्यक्ती कोण आहे ज्याने जगातील सगळ्यात शक्तीशाली लीडरच्या एक्स-वाइफसोबत लग्न केलं?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या हाती पुन्हा एकदा रशियाचं शासन आलं आहे. जगाच्या राजकारणात त्यांना फार महत्वाचं स्थान आहे. त्यांनी सगळ्या देशांवर एक धाक तयार केला आहे. बरेच लोक त्यांना घाबरतात. अशात त्यांची एक्स वाइफ ल्यूडमियाने एका उद्योगपतीसोबत लग्न केल्याची आणि आनंदात संसार करत असल्याची माहिती समोर येत आहे. अशात सगळ्यांनाच प्रश्न पडत आहे की, ही व्यक्ती कोण आहे ज्याने जगातील सगळ्यात शक्तीशाली लीडरच्या एक्स-वाइफसोबत लग्न केलं?

पुतीन यांची लव्हस्टोरी

80 च्या दशकाच्या सुरूवातीला पुतीन यांची ल्यूडमिलासोबत भेट झाली होती. तेव्हा ती सोव्हिएत संघाच्या अधिकृत एअरलाईन्स एअरोफ्लोतमध्ये एअरहोस्टेस होती. दोघेही एका कॉमन फ्रेंडच्या घरी भेटले. या घटनेच्या काही महिन्यांनंतर म्हणजे जुलै 1983 मध्ये त्यांनी लग्न करून संसार थाटला.

यावेळी पुतीन हे देशाचे नेता नव्हते. त्यांची वेगळी ओळख नव्हती. ते इंटॅलिजन्स एजन्सी केजीबीमध्ये फॉरेन इंटॅलिजन्स अधिकारी होते. अंडरकव्हर राहून त्यावेळी ते काम करत होते. असंही सांगितलं जातं की, त्यांनी एका शूज कंपनीमध्ये सेल्समन म्हणूनही काम केलं होतं.

लग्नानंतर ल्यूडमिला यांनी एअरहोस्टेसची नोकरी सोडली आणि ती दुसरी कामे करू लागली. ती जर्मन भाषेती ट्रान्सलेटरही होती. पुतीन हे राष्ट्राध्यक्ष होईपर्यंत तिने एका कंपनीत फोन कॉल घेण्याची आणि मीटिंग्ससाठी कोऑर्डिनेशनचं कामही केलं. यादरम्यान त्यांना दोन मुली झाल्या.

दोघांमध्ये वाद

ब्लादिमीर पुतीन राजकारणात मोठे झाल्यावर त्यांची पत्नी ल्यूडमिया सामान्यपणे समोर येत नव्हती. ती मीडियापासून दूर राहत होती. काही मीडियांनी तेव्हा लिहिलं होतं की, ल्यूडमिलाची काही स्वप्ने होती. पण पुतीन यांना ती मान्य नव्हती. त्यामुळे ल्यूडमिला कधी फार आनंदी दिसली नाही. 2013 मध्ये दोघेही अधिकृतपणे वेगळे झाले.

घटस्फोटानंतरही पुतीन आपल्या पत्नीपासून मनापासून वेगळे झाले नव्हते. 2014 मध्ये एका पत्रकाराने त्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की, त्यांनी आधी ल्यूडमिलाला लग्न करताना बघायचं आहे. नंतर ते त्यांच्याबाबत विचार करतील. 

दुसरी लव्हस्टोरी

पुढील दोन वर्षात ल्यूडमिलाने अर्तुर ओचेरत्नीसोबत लग्न केलं. ल्यूडमिला आणि तिच्या दुसऱ्या पतीच्या वयात 20 वर्षाचं अंतर होतं. आधी या लग्नाबाबत कुणालाच माहीत नव्हतं. सरनेम बदलल्यावर लो प्रोफाइल राहणाऱ्या ल्यूडमिलाच्या नात्याबाबत सगळयांना समजलं. तेव्हा सगळेच तिच्या पतीबाबत जाणून घेण्यास उत्सुक होते.

कोण आहे तिचा दुसरा पती

59 वर्षीय ल्यूडमिलाने जेव्हा पुतीन यांना घटस्फोट दिला त्याच्या आधीपासून ती अर्तुर याना ओळखत होती. ते एका इव्हेंट एजन्सीचे डायरेक्टर जनरल होते. ते मोठमोठ्या क्लाएंट्सचे इव्हेंट ऑर्गेनाइज करत होते. यादरम्यान त्यांची ल्यूडमिलासोबत भेट झाली होती.

पुतीन यांच्यासोबत घटस्फोटानंतर एक घटना घडली ती म्हणजे अर्तुर यानी एक मिनी पॅलेस खरेदी केला जो पुतीन यांची मुलगी कॅथरीनच्या व्हिलाच्या जवळ होता. 2016 मध्ये सरनेम बदलल्यानंतर ल्यूडमिला अधिकृतपणे तिथेच राहत होती. हा व्हिला फ्रान्समध्ये आहे.

पुतीन यांची एक्स-वाइफ आणि दोन मुलींबाबत तशी फार कमी माहिती जाहीर आहे. तसेच ल्यूडमिला यांच्या सध्याच्या पतीबाबतही फार काही माहिती सार्वजनिक नाही. ज्यावरून त्यांच्याबाबत समजू शकेल. व्हिला खरेदी करताना त्यांनी फ्रेंच सरकारला जे काही कागदपत्रे दिली असतील त्यावरून समजलं की, मॉक्सोमध्ये एका छोट्या शहरात त्यांचा जन्म झाला होता. जेथील लोक मजुरी करत होते. अर्तुरचं शिक्षणही सामान्य शाळेत झालं.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनDivorceघटस्फोटrussiaरशिया