शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

'ना उम्र की सीमा हो...', 62 वर्षीय बिल्डरच्या प्रेमात पडली 23 वर्षांची मॉडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 16:43 IST

Willow Sillas and David Simonini : वयाच्या अंतराकडे दुर्लक्ष करून हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आहे.

'ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन...'  जगजीत सिंग यांनी गायलेले हे गाणे 23 वर्षांची मुलगी आणि तिच्या 62 वर्षांच्या पार्टनरवर अगदी योग्य लागू पडते. कारण, दोघांच्या वयात जवळपास 39 वर्षांचा फरक आहे. 

वयाच्या अंतराकडे दुर्लक्ष करून हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आहे. या जोडप्याची भेट टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवर झाली. पहिल्या डेटला भेटल्यानंतरच दोघांमध्ये नाते निर्माण झाले आणि गेल्या काही महिन्यांपासून हे जोडपे एकमेकांसोबत राहत आहे. 

23 वर्षीय मॉडेल विलो सिलास (Willow Sillas) आणि 62 वर्षीय डेव्हिड सिमोनीनी (David Simonini) यांची भेट टिंडरवर झाली. विलोच्या मते, डेव्हिड हे तिची पहिली डेट होती. विलोने सांगितले की, आमच्या दोघांमध्ये पहिल्या डेटलाच एक नाते निर्माण झाले, फक्त 1 तासात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. 

दुसरीकडे, 'हे एक अविश्वसनीय नाते होते, असे वाटले की ते लगेच बनले आहे', असे डेव्हिड यांनी Truly ला सांगितले. दरम्यान, पहिल्या डेटनंतर या जोडप्याने स्वतःच हे नाते सार्वजनिक केले, तेव्हापासून दोघेही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हणून एकमेकांसोबत राहत आहेत. आता हे जोडपे एकत्र जग फिरत आहे, रेस्टॉरंट्सला भेट देत आहे आणि कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. 

विलोने सांगितले की, डेव्हिड यांनी तिला 'बॅकस्ट्रीट बॉईज'च्या कॉन्सर्टमध्येही घेऊन गेले होते. तसेच, जेव्हा डेव्हिड यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा त्यांच्याबद्दलच्या कोणत्याही गोष्टीने मी प्रभावित झाली नाही, तर डेव्हिड यांना माणूस म्हणून जाणून घ्यायचे होते, असे विलोने सांगितले. तसेच, डेव्हिड यांच्या वयाचा फारसा विचार करत नव्हते, असेही विलोने सांगितले

डेव्हिड आणि विलो आपल्या रिलेशनशिप संबंधित मोमेंट्स ऑनलाइन शेअर करत असतात. विलो म्हणाली की, सार्वजनिक ठिकाणी आमच्या वयातील फरकाबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. पण, सोशल मीडिया यूजर्स 'एजगॅप'मुळे खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक डेव्हिड यांना 'शुगर डॅडी' म्हणतात. तर बरेच लोक डेव्हिड यांना आपले आजोबा आणि वडील देखील म्हणतात. 

दरम्यान, अनेक युजर्स विलोला लक्ष्य करतात आणि म्हणतात की, डेव्हिड यांच्या पैशामुळे ती त्याच्यावर प्रेम करते. मात्र, हे जोडपे निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये डेव्हिड यांचे आलिशान पेंटहाऊस आहे. येथे ते विलोसोबत राहतात.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटके