शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वेळ जात नाही; म्हणून 'हा' आवलिया ४० दिवस शरीरावर काढत बसला टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:25 IST

आता या व्यक्तीने आपल्या तोंडावर फक्त टॅटू काढायचा बाकी ठेवला आहे. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे  लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. सतत घरी बंद खोलीत राहिल्यामुळे अनेकांना ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे.  ताण कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधताना दिसून येत आहेत. कोणी सोशल मीडीयावर, कोणी वेगवेगळे पदार्थ तयार करून आपला वेळ घालवायचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत.

लंडनमधील वॉथेम्स्टोचा रहिवासी असलेल्या क्रिस वुडहेड नावाच्या व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये विरंगुळा म्हणून एक वेगळीच शक्कल लढवली आहे. मागील ४० दिवसात रोज स्वतःच आपल्या अंगावर टॅटू काढत आहे. आता या व्यक्तीने आपल्या तोंडावर फक्त टॅटू काढायचा बाकी ठेवला आहे. 

क्रिस यांनी सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात वेळ  घालवण्यासाठी आणि ताण दूर करण्यासाठी प्रत्येक दिवशी एक टॅटू काढायला सुरूवात केली. सुरूवातीपासूनच मला टॅटू काढण्याचा छंद होता. ब्रिटेनचे प्रसिध्द असलेले टॅटू आर्टीस्ट डंकन एक्स हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. ( हे पण वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिस रोज दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत शरीरातील ज्या भागावर टॅटू काढायचा आहे असा भाग शोधतात. त्यांच्या  प्रत्येक टॅटूमध्ये एक अर्थ  दडलेला आहे. इतकंच नाही तर पायांच्या तळव्यावरील टॅटूमध्ये सुद्धा अर्थ दडलेला आहे. क्रिस टॅटू तयार करत असताना  जुन्या टेक्निकचा वापर करतात. ही टेक्निक सध्याच्या टॅटू गनच्या तुलनेत कमी वेदनादायक ठरणारी आहे. त्यांच्यामते टॅटू काढण्याच्या या थेरेपीमुळे आनंद मिळतो. सध्या क्रिस लॉक़डाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. ( हे पण वाचा-आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...) 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके