लंडनमध्ये अश्वाचा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: January 11, 2017 00:53 IST2017-01-11T00:53:32+5:302017-01-11T00:53:32+5:30
चतुष्पाद प्राणीही आपला उपयोग करतो यापेक्षा अधिक चांगली जाहिरात सार्वजनिक वाहतूकीसाठी कोणती असू शकेल

लंडनमध्ये अश्वाचा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न
लंडन : चतुष्पाद प्राणीही आपला उपयोग करतो यापेक्षा अधिक चांगली जाहिरात सार्वजनिक वाहतूकीसाठी कोणती असू शकेल? पोलिस अश्व दुमजली बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून लंडनमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राजकीय नेते सिमोन क्रोक्रॉफ्ट यांचाही त्यात समावेश होता. सिमोन इस्लिंग्टन येथून जात असताना त्यांच्या नजरेस हे विलक्षण दृष्य पडले. त्यामुळे ते थबकले, असे वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले आहे.