शहरं
Join us  
Trending Stories
1
कंगाल पाकिस्तानला मदतीचे पैसे मिळवून देणारी अमेरिका स्वत: मोठ्या कर्जात! अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
2
पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
3
Goa Fire: गोवा आग प्रकरणी मोठी कारवाई, लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक, मुख्य आरोपी बँकॉकला पसार!
4
शेवटचा सत्यशोधक, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले
5
भारतीय तांदळावर आणखी टॅरिफ? भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत डम्प करू नये
6
तातडीनं व्याजदर कमी करा; ग्राहकांपर्यंत १.२५% व्याज कपातीचा फायदा पोहोचवा, RBIचा बँकांना स्पष्ट निर्देश
7
शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार
8
Cryptocurrency मधून सरकारची बक्कळ कमाई; वसूल केला ५१२ कोटी रुपयांचा टॅक्स, महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान
9
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
10
वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती?
11
अबब! धान्यराशीसारखी आमदाराकडे नोटांची बंडले; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओने राजकीय वातावरण तापले
12
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता
13
दरमहिना ११ लाख पगार असेल तरच 'या' देशात मिळणार दारू; दुकानावर दाखवावा लागणार पुरावा
14
एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल
15
विधानभवन परिसरात फिरणाऱ्या दलालांवर ‘वॉच’ बिनकामाच्या लोकांना चाप, घेतली जात आहे गुप्त माहिती
16
महापालिकेत युती; वाद विसरून एकोपा, देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांसमोर शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्यात रुसवेफुगवे
17
‘गारगाई’च्या बांधकामाला १० वर्षांनी मिळाला मुहूर्त; वाढीव पाण्याची गरज प्रकल्पामुळे भागणार
18
अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा; बँकेला २२८ कोटींना फसवल्याचा आरोप सीबीआयने घेतली झडती
19
महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही
20
गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा : कायद्यात सुधारणा करणार
Daily Top 2Weekly Top 5

दरमहिना ११ लाख पगार असेल तरच 'या' देशात मिळणार दारू; दुकानावर दाखवावा लागणार पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 08:13 IST

सौदी सरकार रियाध व्यतिरिक्त सौदी अरेबियातील इतर दोन प्रमुख शहरांमध्येही असेच परवानाधारक स्टोअर उघडण्याची तयारी करत आहे

भारतात कुणीही व्यक्ती मग तो श्रीमंत असेल वा गरीब दारू पिऊ शकतो परंतु आपल्या कठोर नियमांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सौदी अरेबिया देशात दारू पिण्यासाठी महिन्याला किमान ११ लाख कमावणे गरजेचे आहे. सौदी अरेबियात दारू पिण्याबाबत कडक कायदे आहेत. परंतु आता काही निवडक मुस्लीम इतर परदेशी पर्यटकांना त्यातून सूट मिळाली आहे. परंतु ही सूट प्रत्येकासाठी नाही. सौदीत केवळ तेच लोक दारू पिऊ शकतात, ज्यांचे मासिक उत्पन्न कमीत कमी ५० हजार सौदी रियाल म्हणजेच ११ लाख रूपये असेल. दारू पिण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि सॅलरी सर्टिफिकेट दुकानावर दाखवावे लागेल.

एका रिपोर्टनुसार, सौदी अरेबिया केवळ एकच दारूचं दुकान आहे जे राजधानी रियाधमध्ये आहे. या दुकानाचे दरवाजे प्रत्येकासाठी खुले नाहीत. सुरुवातीला केवळ परदेशी राजनैतिकांसाठी ही उघडण्यात आले होते परंतु आता प्रिमियम रेजिडेंसी असणाऱ्या गैर मुस्लीम परदेशी नागरिकांसाठी हे खुले केले आहे. हे रेजिडेंसी विशेषतः  हाय प्रोफेशनल व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि मोठे व्यापारी मालकांसाठी डिझाइन केलेले आहे. परदेशी नागरिकही या दुकानातून हवी तेवढी दारू घेऊ शकत नाही. दर महिन्याला एक ठराविक कोटा निर्धारित करण्यात आला आहे. 

"पॉइंट-बेस्ड" मासिक कोटा सिस्टम अंतर्गत अल्कोहोल खरेदी करता येईल. याचा अर्थ, कोणीही अमर्यादित दारू खरेदी करू शकणार नाही त्याऐवजी त्यांना त्यांच्या मासिक खरेदीला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेवले आहे. सौदी सरकार रियाध व्यतिरिक्त सौदी अरेबियातील इतर दोन प्रमुख शहरांमध्येही असेच परवानाधारक स्टोअर उघडण्याची तयारी करत आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या निर्णयानंतर नवीन वाद समोर आला आहे. काही युजर्सच्या मते सौदी अरेबियाला धर्मापेक्षा जास्त व्यवसाय आणि पैसा महत्त्वाचा झाला आहे. तर काहींच्या मते हा नियम फक्त श्रीमंत पर्यटक आणि बड्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी घेतला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Arabia: Only those earning ₹1.1 million can buy alcohol.

Web Summary : In Saudi Arabia, only individuals earning ₹1.1 million monthly can purchase alcohol with proof of income. Limited to premium residents, a point-based quota system restricts purchases. More stores are planned, sparking debate about prioritizing business over religious values.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबिया