पाक कलाकारांना भारतात काम करू द्यावे- राधिका आपटे

By Admin | Updated: October 5, 2016 01:03 IST2016-10-04T22:32:36+5:302016-10-05T01:03:47+5:30

भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करून द्यावे, असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिनं केलं आहे.

Let the culinary artists work in India - Radhika Apte | पाक कलाकारांना भारतात काम करू द्यावे- राधिका आपटे

पाक कलाकारांना भारतात काम करू द्यावे- राधिका आपटे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करून द्यावे, असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिनं केलं आहे. करण जोहर, सलमान खान, ओम पुरी यांच्यानंतर राधिका आपटेनं या वादात उडी घेतली आहे. स्वॉच या घड्याळाच्या ब्रँडचं राधिका हिच्या हस्ते उद्घाटन झाले.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी तिला पाकिस्तानी कलाकारांच्या प्रश्नावर छेडले असता, तिनं हे उत्तर दिलं आहे. भारतात स्वॉच घड्याळं चालतात, मग पाकिस्तानी कलाकार का चालत नाहीत, असा सवालही तिनं उपस्थित केला आहे. पाकिस्तानी कलाकारांनी भारतात येऊन बिनधास्त काम करावे, असेही ती म्हणाली आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर पाक कलाकारांनी भारत सोडून निघून जावे, अशी धमकी मनसेनं दिली आहे. त्यानंतर पाक कलाकारांनी भारतात काम करावे किंवा नाही; यावरून मोठ्या वादाला तोंड फुटले असतानाच राधिका आपटेनं पाक कलाकारांना बिनधास्त भारतात काम करावे, असं वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

Web Title: Let the culinary artists work in India - Radhika Apte