शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

टॉयलेट, बाथटब, सिंक सगळंकाही सोन्याचं....या हॉटेलचा कोपरा-कोपरा आहे सोन्याचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 13:59 IST

Dolce by Wyndham Hanoi Golden Lake : हॉटेलमधील बाथटब, लॅम्प आणि भिंतीही सोन्याने तयार केल्या आहेत. हॉटेलमधील रूमच्या बुकिंगची सुरूवात 9 हजार रूपयांपासून होते. 

व्हिएतनामची राजधानी हनोईमधील एक हॉटेल सध्या चर्चेत आहे. कारण हे हॉटेल पूर्णपणे सोन्याने बनलं आहे. या हॉटेलमधील टॉयलेटही सोन्याने बनले आहेत. हॉटेलमधील बाथटब, लॅम्प आणि भिंतीही सोन्याने तयार केल्या आहेत. हॉटेलमधील रूमच्या बुकिंगची सुरूवात 9 हजार रूपयांपासून होते. 

Dolce by Wyndham Hanoi Golden Lake नावाचं हे हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईच्या उत्तरेत आहे. या हॉटेलमध्ये जे कुणी थांबतात त्यांना शाही सेवा दिली जाते. या फाइव्ह स्टार हॉटेलमधून शहराचा शानदार नजारा बघायला मिळतो.

डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, या हॉटेलमध्ये रेस्टॉरन्ट, फिटनेस सेंटर, बार, लॉन्ज आणि बिझनेस सेंटरसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. त्याशिवाय 24 तास करन्सी चेंजची सुविधा आणि रूम सेवा मिळते.

हॉटेलमधील ज्या रूम्स आहेत, त्याच्या आत सोन्याचा बाथटब, सोन्याचे सिंक, सोन्याचं टॉयलेट आणि खिडक्यांवर सोन्याच्या फ्रेम आहे. या हॉटेलमधील स्टाफ इंग्रजीसोबत सहा भाषा बोलतात. 

त्याशिवाय शहरातील Bach Ma Temple, Hanoi Opera House, The Imperial Citadel Of Thang Long बघण्यासारखी ठिकाणं आहेत. तसेच स्ट्रीटफूड आवडणाऱ्यांसाठी Dong Xuan Market आहे.

या हॉटेलबाबत अनेक पर्यटकांनी कौतुक केलं आहे. एका यूजरने लिहिलं की, हे हॉटेल खूप शानदार आहे आणि तुमची स्वप्ने पूर्ण करतं. इथे सगळंकाही सोन्याचं आहे आणि मनमोहक आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGoldसोनं