'या' व्यक्तीच्या तोंडातून काढण्यात आला जगातला सर्वात मोठा दात, लांबी वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:35 AM2019-10-31T11:35:26+5:302019-10-31T11:36:57+5:30

अर्थातच कुणी आपल्या दातांची लांबी मोजत बसत नसतं. पण ही बातमी वाचल्यावर तुम्ही दातांची लांबी नक्कीच मोजाल.

The largest tooth in the world was removed from the mouth of this 'person'! | 'या' व्यक्तीच्या तोंडातून काढण्यात आला जगातला सर्वात मोठा दात, लांबी वाचून व्हाल अवाक्....

'या' व्यक्तीच्या तोंडातून काढण्यात आला जगातला सर्वात मोठा दात, लांबी वाचून व्हाल अवाक्....

googlenewsNext

अर्थातच कुणी आपल्या दातांची लांबी मोजत बसत नसतं. पण ही बातमी वाचल्यावर तुम्ही दातांची लांबी नक्कीच मोजाल. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक अनोखा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. हा रेकॉर्ड आहे मनुष्याच्या सर्वात लांब दाताचा. हा दात क्रोएशियाई वंशाच्या एका जर्मन रूग्णाच्या तोंडातून काढण्यात आला. या दातांची लांबी खरंच हैराण करणारी आहे. 

रिपोर्ट्सनुसार, जगातला हा सर्वात लांब दात जर्मनीच्या Offenbach शहरात राहणाऱ्या डेंटिस्ट डॉ. मॅक्स लुकसने काढलाय. त्यांना यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देण्यात आला आहे. त्यांनी हा दात माइंत्स शहरात राहणाऱ्या क्रोएशियायी वंशाच्या जर्मन रूग्णांच्या तोंडातून काढला.

किती आहे लांबी?

रिपोर्ट्सनुसार, या दाताची लांबी ३७.२ मीटर म्हणजे १.४६ इंच इतकी आहे. डॉ.मॅक्स यांनी हा दात २०१८ मध्ये काढला होता. गिनीज बुकमध्ये नोंद होण्यापूर्वी त्यांनी एक वर्ष महत्वाची कागदपत्रे जमा केली. या सर्वात लांब दाताचा खालचा भाग हा तीन चतुर्थांश इतका आहे. हा भाग हिरडीखाली राहतो.

डॉ. मॅक्स लुकसने एका स्थानिक वृत्तपत्राला  सांगितले की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं मिळालेलं सर्टिफिकेट ते ऑफिसमध्ये लावतील. त्यांच्यांनुसार, 'जगातला प्रत्येक डेंटिस्ट याबाबत वाचेल'. रूग्ण असह्य वेदना होत असल्याने डॉक्टरकडे आला होता.  


Web Title: The largest tooth in the world was removed from the mouth of this 'person'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.