शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 13:36 IST

लग्न म्हटलं की, आजकाल सगळेच नवरदेव घोडीवर बसून येतात. म्हणजे आता तर असं झालंय की, घोडीवर बसून येणं फॅशन झाली आहे.

(Image Credit : patrika.com)

लग्न म्हटलं की, आजकाल सगळेच नवरदेव घोडीवर बसून येतात. म्हणजे आता तर असं झालंय की, घोडीवर बसून येणं फॅशन झाली आहे. वरातीला घोडी असल्याशिवाय नवरदेव बाहेरच येत नाही. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, लग्नात नवरदेव घोडीवर बसूनच का येतात? किंवा याचं कारण काय आहे? खरंतर सगळ्यांना घोडीवर बसून स्टाईल मारायची घाई असते कारण कशाला कुणी शोधत बसणार ना...पण आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

(Image Credit : in.pinterest.com)

Quora नुसार, घोड्यांना हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. मग तो अश्वमेध यज्ञ असो वा कृष्णाकडून अर्जूनाचा रथ चालवणं असो घोड्यांचं महत्व वेळोवेळी बघायला मिळतं. तसेच राजा म्हटले की घोडा असणारच हे समीकरणच होतं. पण घोडा चालवण्याचा थेट अर्थ असा आहे की, घोडा चालवणाऱ्या व्यक्तीने आता बालपणाचा त्याग केलाय आणि ती व्यक्ती भरपूर जबाबदाऱ्या असलेल्या जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरूवात करणार असते.

(Image Credit : amarujala.com)

याचं आणखी दुसरं कारण असं सांगितलं जातं की, प्राचीन काळात जेव्हा लग्ने होत होती तेव्हा नवरीसाठी किंवा आपल्या शौर्याचं प्रदर्शन करण्यासाठी लढाई केली जात होती. शास्त्रात असे अनेक प्रसंग वाचायला मिळतात जेव्हा नवरदेवाला नवरीसाठी लढाई करावी लागली.

(Image Credit : YouTube)

एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, नवरदेव घोड्याऐवजी घोडीवर बसतात कारण घोडी जास्त चंचल असते आणि त्यांना वशमध्ये करणं म्हणजेच कंट्रोल करणं कठिण असतं. काही इतर मान्यतांनुसार, घोडी बुद्धीमान, दक्ष आणि चलाख प्राणी आहे. घोडीला कंट्रोल करणं या गोष्टीचं प्रतीक मानलं जातं की, नवरदेव आता परिवाराची धुरा सांभाळू शकतो.

Yahoo च्या एका रिपोर्टनुसार, जास्तीत जास्त पंजाबी लग्नांमध्ये घोडीला सजवलं जातं आणि तिच्या शेपटीवर मोली बांधली जाते. तर नवरदेवाची बहीण घोडीला चणे खाऊ घालते. पूर्वी उत्तर भारतातील किंवा पंजाबातील लग्नांमध्येच घोडीचा वापर केला जात होता. पण आता तर देशातील सगळ्याच लग्नात नवरदेव घोडीवर बसून वरात काढतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सmarriageलग्न