शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नॉलेज! गुन्हेगारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'गुंडा' शब्दाचा जन्म कसा झाला, जाणून घ्या कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 15:45 IST

पोलिसांबाबतही नकारात्मक शब्द वापरायचा असेल तर त्यासाठी पोलिसवाला गुंडा म्हटलं जातं.  पण तुम्ही कधी विचार केला का की, गुंडा शब्दाचा जन्म कुठून झाला. 

बदमाश लोकांसाठी एका शब्दाचा फार जास्त वापर होतो आणि तो शब्द आहे गुंडा. या गुंडा शब्दापासूनच गुंडागर्दी सारखे शब्द तयार झाले. म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, गुंडा शब्द, बदमाश, दादागिरी इत्यादींसाठी वापरला जातो. आता तर याला नकारात्मकेसाठीही वापरला जातो. पोलिसांबाबतही नकारात्मक शब्द वापरायचा असेल तर त्यासाठी पोलिसवाला गुंडा म्हटलं जातं.  पण तुम्ही कधी विचार केला का की, गुंडा शब्दाचा जन्म कुठून झाला. 

जर गुंडा शब्दाची कहाणी वाचली तर इंटरनेटवर अनेक तथ्य आहेत. गुंडा शब्दाची उत्पत्तीबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. जास्तीत जास्त आर्टिकल आणि लेखांमध्ये बदमाशच्या अर्थात वापरला जाणारा गुंडा शब्द पश्तो भाषेतील आहे. पण काही लेख असेही आहेत ज्यात सांगण्यात आलं आहे की, हा पश्तो भाषेतील शब्द नाही. अशात चला जाणून घेऊ गुंडा

शब्दाबाबत काही तर्क...

काय आहे याचा अर्थ? - 'गुंड' चा अर्थ गाठ किंवा उथळ असण्याशी आहे. एखाद्या समतोल जागेवर उथळ जागा असेल तर त्यालाठी गुंडा शब्दाचा वापर केला जातो. असाच समाजात मोठा झालेला व्यक्ती, ज्याची प्रतिष्ठा जास्त आहे त्याच्यासाठीही गुंडा शब्दाचा वापर होतो. याला शूरवीर, योद्धा म्हणून पाहिलं जातं. म्हणजे शाब्दिक अर्थात याचा निगेटिव्ह वापर नाहीये. पण आता याचा नकारात्मकपणे वापर केला जातो.

असं म्हटलं जातं की, पश्तो भाषेतून हा शब्द आला आहे आणि पश्तो भाषेत याचा अर्थ बदमाश व्यक्ती असा होता. त्यामुळे याचा वापर नकारात्मक भावार्थाने केला जातो. पण दक्षिण भारतात असं नाहीये. इथे याला भांडखोर नाही तर एक योद्धा म्हणून पाहिलं जातं. तमिळमद्ये गुंडा शक्तीशाली नायकाचा आहे. जसे की, गुंडराव, गुंडराज इत्यादी. मराठीत 'गाव-गुंड' ग्राम योद्धा असतो. इथे गुंडाचा अर्थ मुळात प्रधान किंवा नेत्याचा भाव आहे. अशात असं म्हटलं जाऊ शकतं की, गुंडा शब्दाचा वापर केवळ नकारात्मक शब्दासाठी होत नाही.

पश्तो नाही गुंडा शब्द - इंटरनेटवरील एका आर्टिकलमध्ये सांगण्यातत आलं आहे की, गुंडा पश्तो शब्द नाही. सोबतच असंही सांगण्यात आलं आहे की, वर्ष १९१० आधी गुंडा शब्दाचा वापर केला जात नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये गुंडा शब्दाचं प्रचलन १९२० च्या जवळपास सुरू झालं. त्याआधी याचा उल्लेख नाही. 

या व्यक्तीपासून आलं गुंडा नाव?  - काही कथांमध्ये सांगण्यात आलं आहे की, १९१० दरम्यान बस्तरच्या गुंडा धूरच्या नावाहून हे नाव पडलं. त्यावेळी त्यांनी इंग्रजांना हाकलून बाहेर करण्याचा निश्चय केला होता आणि इंग्रज सरकारने त्याला व्हिलन व्यक्ती मानून गुंडा ठरवलं. त्यानंतर या शब्दाचं चलन आलं असं म्हणतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके