शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात १३ नंबरला का मानलं जातं अशुभ? कारण वाचून वाटेल आश्चर्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:34 IST

जगभरात १३ नंबरला फार अशुभ मानलं जातं. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात, जी क्वचितच तुम्हाला माहीत असतील.

(Image Credit : livescience.com)

जगभरात १३ नंबरला फार अशुभ मानलं जातं. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात, जी क्वचितच तुम्हाला माहीत असतील. जगभरात १३ नंबरला अशुभ मानलं जातं. त्यामुळे बरेच लोक या नंबरपासून दूर राहतात. इतकेच काय तर काही लोक तर या नंबरचा उच्चारही करत नाहीत. पण याची कारणे काय आहेत, हे जाणून घेऊ...

खासकरून पाश्चिमात्य देशांमध्ये याची भीती लोकांच्या मनात आहे. या देशांमध्ये १३ नंबरबाबत जेवढी भीती आहे, तेवढी कुठेही बघायला मिळणार नाही. पण याचं नेमकं कारण जाणून घ्याल तर तुम्हाला कदाचित त्यांच्या भीतीचं कारण कळेल. यातून आमचा तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश अजिबात नाही. पण या १३ नंबरच्या काही रहस्यमय गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.  

थर्टीन डिजीट फोबिया

(Image Credit : social media)

काही रिपोर्ट्नुसार, १३ तारखेला अशुभ मानलं जातं कारण एकदा येशु ख्रिस्तांसोबत एका व्यक्तीने विश्वासघात केला होता. ही व्यक्ती येशुंसोबत रात्री जेवण करत होती. ही व्यक्ती १३ नंबरच्या खुर्चीवर बसलेली होती. तेव्हापासून लोक या अंकाला अशुभ मानतात आणि तेव्हापासूनच लोक या अंकापासून दूर पळतात. मनोविज्ञानाने या १३ अंकाच्या भितीला ट्रिस्कायडेकाफोबिया किंवा थर्टीन डिजीट फोबिया असं नाव दिलं आहे. ही भीती लोकांमध्ये इतकी वाढली आहे की, लोकांना या अंकाचा वापरच बंद केला आहे.

परदेशात १३ अंकाची भीती

(Image Credit : byrdie.com)

जर तुम्ही परदेशात कधी फिरायला गेलात आणि हॉटेलमध्ये थांबल्यावर १३ क्रमांकाची रूम किंवा इमारतीत १३ वा मजला दिसला नाही तर समजून घ्या की,  मालक १३ अंकाला अशुभ मानतो. तुम्हाला अनेक लोक असेही दिसू शकतात जे हॉटेलमध्ये १३ नंबरची रूम घेणेही पसंत करत नाहीत. तसेच काही बार किंवा रेस्टॉरन्टमध्ये १३ नंबरचा टेबलही बघायला मिळत नाही. 

भारतात १३ अंकाचा प्रभाव

(Image Credit : blog.lakeside.com)

१३ अंकाची भीती  केवळ पाश्चिमात्य देशांमध्येच नाही तर भारतातही बघायला मिळते. इथेही अनेक लोक या अंकाला अशुभ मानतात. चंदीगड हे शहर देशातील सर्वात युनियोजित शहर मानलं जातं. हे शहर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातील शहर होतं. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, या सुनियोजित शहरात सेक्टर १३ नाही. या शहराचा नकाशा तयार करणाऱ्या आर्किटेक्टने १३ नंबरचं सेक्टरचं बनवलं नाही. तो १३ अंकाला अशुभ मानत होता. या आर्किटेक्टला परदेशातून बोलवण्यात आलं होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स