शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

'या' नदीतील पाण्यासोबत वाहत राहतं सोनं, श्रीमंत होण्यासाठी येत राहतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:23 IST

जगभरात सोनं म्हटलं की, कुणाचेही डोळे चमकतात. कारण हा एक महागडा आणि लोकांना आवडणारा सर्वात धातू आहे. सोन्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीची लोकांना उत्सुकता असते.

जगभरात सोनं म्हटलं की, कुणाचेही डोळे चमकतात. कारण हा एक महागडा आणि लोकांना आवडणारा सर्वात धातू आहे. सोन्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीची लोकांना उत्सुकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका नदीबाबत सांगणार आहोत, ज्या नदीतील पाण्यासोबत सोनंही वाहत पुढे जातं. ही नदी कॅनडातील डॉसन शहरात आहे.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, कॅनडातील डॉसन शहर हे पर्यटनासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. कदाचित यामुळेही कारण अनेकांना इथे श्रीमंत होण्याची संधी मिळाली. आता श्रीमंत होण्याची गोष्ट तुमचेही कान टवकारले असतील ना? आणि सोबतच या ठिकाणाबाबत जाणून घेण्याचीही उत्सुकता वाढली असेल.

डॉसन हे शहरातील लोकसंख्या कमी असून हे शहर क्लोनडाइक नदीच्या किनारी वसलं आहे. असे सांगितले जाते की, या नदीच्या तळात सोनं असतं. १८९६ मध्ये जॉर्ज कार्मेक, डॉसन सिटी चार्ली आणि स्कूकम जिम मेसन यांनी सर्वात पहिले या नदीत सोनं असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून इथे सोनं शोधणाऱ्यांची गर्दी होऊ लागली. 

सोन्याच्या या नदीजवळ जमा झालेली वाळू लोक बाकेटित भरून नेतात आणि ती गाळतात. त्यातून सोन्याचे तुकडे वेगळे केले जातात. सोन वेगवेगळ्या रूपात यात आढळतं. ते मोत्यासारखंही दिसू शकतं. तसंच पातळ वस्तूसारखंही दिसू शकतं. असं नाही की, प्रत्येक वेळी सोनं सापडतंच. कधी कधी खूप मेहनत करूनही काही हाती लागत नाही. काही लोक तर इथे जमीन विकत घेतात कारण तिथे सापडणाऱ्या सोन्यावर त्यांचा हक्क रहावा.

आज एक चमचा चहा पावडर इतकं सोनं इथे १३०० डॉलरला विकलं जातं. डॉने मिशेल, डॉसन सिटीमध्ये १९७७ मध्ये आले होते. ते सोनं काढण्याचं काम करतात. ते आता पर्यटकांना सोनं कसं शोधावं हे शिकवतात. ते सांगतात की, दिवसभर कामासाठी ते शेजारच्या शहरात जातात आणि सुट्टीच्या दिवशी सोनं शोधतात. 

डॉसन शहरात नेहमीच मोठ्या प्रमाणात सोन्यासाठी खोदकाम केलं जात आहे. आजही यूकॉनच्या १९६ मायनिंग साइटपैकी १२४ डॉसन शहरात आहेत. बोनांजा क्रीक डिस्ट्रिक्ट यांच्याही सर्वात जास्त खदाणी इथे आहेत. मिशेलनुसार, सोनं शोधण्याचं काम इथे अजून बरीच वर्ष चालणार आहे. 

टॅग्स :CanadaकॅनडाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके