शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'या' अब्जाधीशाने खरेदी केला डायनासॉरचा सांगाडा, किंमत वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 12:44 IST

dinosaur skeleton : या सांगाड्याचं नाव एपेक्स आहे. हा सांगाडा साधारण ८.२३ मीटर लांब असून हा डायनासॉरचा सांगाडा जवळपास १५० मिलियन वर्ष जुना आहे.

dinosaur skeleton : अब्जाधीश केन ग्रिफीन सध्या एका डायनासॉरचा सांगाडा विकत घेण्यावरून चर्चेत आहे. ३७.८ अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या केन यांनी हा सांगाडा ४४.६ मिलियन डॉलर म्हणजे एकूण ३,७४,४२,१४,६०० रूपयांना खरेदी केला. हा अवशेषांच्या लिलावाचा एक नाव रेकॉर्ड झाला आहे. या सांगाड्याचं नाव एपेक्स आहे. हा सांगाडा साधारण ८.२३ मीटर लांब असून हा डायनासॉरचा सांगाडा जवळपास १५० मिलियन वर्ष जुना आहे.

एका लिलावात त्यांनी हा सांगाडा खरेदी केला. न्यूयॉर्कच्या सोथबीजमध्ये हा लिलाव पार पडला. आधी असा अंदाज लावण्यात आला होता की, या सांगाड्याला साधारण ६ मिलियन डॉलर इतकी किंमत मिळेल. पण केन यांनी जवळपास ११ पट जास्त किंमत देऊन सगळ्यांनाच धक्का दिला.

एपेक्स नावाचा हा डायनासॉरचा सांगाडा मे २०२२ मध्ये कोलोराडोमध्ये शोधण्यात आला होता. हा आतापर्यंत शोधण्यात आलेल्या सगळ्यात मोठ्या सांगाड्यापैकी एक आहे. या सांगाड्यात साधारण २५४ हाडे सापडली. ज्या ३१९ हाडांपैकी एक आहेत. हा सांगाडा खरेदी केल्यावर केन यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, "एपेक्स अमेरिकेत जन्माला आला होता आणि अमेरिकेतच राहणार". त्यांनी हा सांगाडा केवळ आवड म्हणून खरेदी केला नाही तर ते हा सांगाडा एखाद्या अमेरिकन संस्थेला कर्जावर देऊ शकतात जेणेकरून लोक याला बघू शकता. 

एपेक्सची खरेदी करून त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तुंच्या संग्रहात आणखी एका गोष्टीची भर घातली आहे. यातून हेही दिसून येतं की, श्रीमंत लोक ऐतिहासिक आणि अनोख्या गोष्टींवर पैसे लावू लागले आहेत. 

यातून हेही दिसून येतं की, दुर्मिळ गोष्टी किती मौल्यवान आहेत. श्रीमंत लोक आणि संस्थांमध्ये या गोष्टी खरेदी करण्यात एक स्पर्धाच रंगली आहे. यामुळे लोकांमध्ये डायनासॉरबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल