शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अश्रूंचा बांध फुटला, भारत-पाक फाळणीनंतर दुरावलेल्या भावांची ७४ वर्षांनी गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 10:35 AM

भारतातील पंजाबच्या डेरा बाबा नानकपासून पाक सीमेपर्यंत कॉरिडोर बनला आहे. तर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे

नवी दिल्ली – १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीवेळी अनेक कुटुंब विखुरली गेली. त्यातीलच एक मोहम्मद सिद्दिकी. सिद्दिकी यांचे भाऊ हबीब उर्फ शेला फाळणीनंतर भारतातच राहिले. आता ७४ वर्षानंतर करतारपूर कॉरिडोर, जे पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब आणि भारत यांना जोडतं, त्याने दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणलं आहे.

सध्या सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहून अनेक जण खूप भावूक झालेत. या व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद सिद्दिकी पाकिस्तानीच्या फैसलाबाद येथे राहतात तर त्यांचा भाऊ भारताच्या पंजाब प्रांतात राहतात. करतारपूरमध्ये दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर भावूक झाले. एकमेकांची गळाभेट केली तेव्हा अश्रूंचा बांध फुटला. इतक्या वर्षांनी दोघांची भेट झाली होती.

सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दोन्ही भाऊ करतारपूर कॉरिडोरमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही लोकं आहेत. व्हिडिओत दोघंही एकमेकांना भावूक होऊन मिठी मारताना दिसून येतात. या दोन्ही भावांनी भारत आणि पाकिस्तान सरकारला करतारपूर कॉरिडोर उघडल्याबद्दल आभार मानले आहेत. कॉरिडोरच्या माध्यमातून भारताचे लोक विना व्हिसा पाकिस्तानच्या करतारपूर येथे जाऊ शकतात. हा कॉरिडोर २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये सुरु झाला होता.

ही घटना पहिल्यांदाच घडली असं नाही. मागील वर्षीही एकमेकांपासून दुरावलेल्या दोन मित्रांची भेट ७३ वर्षांनी झाली होती. भारतात राहणाऱ्या सरदार गोपाल सिंह यांचा लहानपणीचा मित्र पाकिस्तानातील मोहम्मद बशीर हे दोघंही फाळणीनंतर एकमेकांपासून दूर गेले. या दोघांचीही भेट करतारपूर कॉरिडोरमुळे झाली होती. भारतातील पंजाबच्या डेरा बाबा नानकपासून पाक सीमेपर्यंत कॉरिडोर बनला आहे. तर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे. यालाच करतारपूर साहिब कॉरिडोर म्हणतात. करतारपूर साहिब हे शीख धर्मीयांचे पवित्र स्थान आहे. पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यात ते आहे. तर करतारपूरला पहिला गुरुद्वारा मानलं जातं. ज्याचा पाया गुरु नानक देव जी यांनी रचला होता. याठिकाणी माथा टेकवण्यासाठी भारतातून अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी पाकिस्तानात जात असतात.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान