'नमस्ते ट्रम्प' ची हवाच न्यारी, मोदी आणि ट्रम्प नावाचा हेअरकट भारी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 11:41 IST2020-02-24T11:30:37+5:302020-02-24T11:41:53+5:30

जोधपूरमधिल मयंक छंगानी नावाच्या व्यक्तीने आपल्या केसांची एक अनोखी हेअरस्टाईल केली आहे.  

Jodhpur man done a special hair cut for president donald trump and narendra modi | 'नमस्ते ट्रम्प' ची हवाच न्यारी, मोदी आणि ट्रम्प नावाचा हेअरकट भारी....

'नमस्ते ट्रम्प' ची हवाच न्यारी, मोदी आणि ट्रम्प नावाचा हेअरकट भारी....

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.  ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांचा मैत्रीबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे. ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. अहमदाबादमध्ये होणारा मोदी व ट्रम्प यांचा रोड शो व त्यानंतर मोटेरा स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम  दृश्य स्वरूपातील मुख्य  आकर्षण होता. 

याच सोहोळ्याचा आनंद जोधपूर मध्ये सुद्धा दिसून येत आहे. जोधपूरमधिल मयंक छंगानी नावाच्या व्यक्तीने आपल्या केसांची एक अनोखी हेअरस्टाईल केली आहे.  ही  हेअरस्टाईल ट्रम्प यांना वेलकम करण्यासाठी केली आहे. मयंक यांनी आपल्या केसांवर स्टाईल करून  दोन नेत्यांचे नाव काढले आहे.

डोक्याच्या मागच्या बाजूला मधोमध तिरंगा सुद्धा काढला आहे. डोक्याच्या एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर त्या विरूध्द असेलल्या बाजूला मोदींच्या नावाची हेअर कटींग केली आहे. 

मयंक यांची हेअर कटिंग पाहून रस्त्यावर त्यांना पाहत असलेले लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी घाई करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मयंक यांच्या कार्यशैलीने प्रभावित झाले आहेत. 

Web Title: Jodhpur man done a special hair cut for president donald trump and narendra modi