लय भारी! अवघ्या 14 दिवसांची नोकरी करून मिळणार तब्बल 9 लाख पगार; करावं लागणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 04:20 PM2021-11-16T16:20:14+5:302021-11-16T16:22:19+5:30

JOB : 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीसाठी ही नोकरी असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

jobs rich family in united kingdom looking nanny for 14 days salary will be around 9 lakhs | लय भारी! अवघ्या 14 दिवसांची नोकरी करून मिळणार तब्बल 9 लाख पगार; करावं लागणार 'हे' काम

लय भारी! अवघ्या 14 दिवसांची नोकरी करून मिळणार तब्बल 9 लाख पगार; करावं लागणार 'हे' काम

googlenewsNext

नोकरी शोधणाऱ्या तरुणांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. रोजची आठ-नऊ तासांची शिफ्ट, बॉसची कटकट आणि कामाचं प्रेशर यामुळे कित्येकदा नोकरी सोडून देण्याची इच्छा होते. पण पैशासाठी अनेकदा हा त्रास सहन केला जातो. तुम्हाला जर कोणी अवघ्या14 दिवसांची नोकरी करून तब्बल 9 लाख पगार मिळणार असल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला हे खोटं वाटेल पण हो हे खरं आहे. ब्रिटनमधील एडिनबर्गमध्ये ही नोकरी सध्या उपलब्ध आहे. याची एक जाहिरात देखील देण्यात आली आहे. 

जाहिरातीनुसार, 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीसाठी ही नोकरी असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एका श्रीमंत कुटुंबाने ही नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. नॅनी या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये मुलांना सांभाळण्यासाठी एका नॅनीची गरज असल्याचं कुटुंबीयांनी जाहीर केलं आहे. पाच वर्षांची दोन जुळी मुलं असून त्यांची काळजी घ्यायची आहे. दररोज 59 हजार रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे यानुसार 14 दिवसांचा भारतीय चलनाप्रमाणे तब्बल 9 लाख रुपये पगार मिळणार आहे. 

14 दिवस काम करून 9 लाख पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी

ख्रिसमस असल्यामुळे नॅनी मिळणं सध्या कठीण झालं आहे. त्यामुळेच ही भल्यामोठ्या पगाराची ऑफर देण्यात आली आहे. नोकरी करणाऱ्या नॅनीला त्यांचा 14 दिवस पूर्ण सांभाळ करावा लागणार आहे. या काळात तिला घरी जाता येणार नाही. ख्रिसमसच्या दिवशीदेखील तिला नोकरीवरच थांबावं लागेल आणि मुलांकडे लक्ष द्यावं लागेल. मुलांना अंघोळ घालणे त्यांना खाऊपिऊ घालणे, त्यांच्यासोबत खेळणे, झोपवणं अशी कामं नॅनीला करावी लागणार आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला मुलाला सांभाळण्याचा पाच वर्षांचा अनुभव हवा. यासोबतच त्याचे लसीकरण देखील झालेलं असणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: jobs rich family in united kingdom looking nanny for 14 days salary will be around 9 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी